लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 18 ऑगस्ट : नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये (Nashik Medical College) शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू (Trainee Doctor Suspicious death) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे (Swapnil Maharudra Shinde) असे होते. तो गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी स्वप्नील शिंदेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. रॅगिंगमुळे आत्महत्या? डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच मेडिकल कॉलेजमधील दोन मुलींवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी करण्यात आली आहे. बालभारतीने 426 मेट्रिक टन पुस्तके काढली रद्दीत कॉलेज प्रशासनाकडून आरोपांचे खंडन स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन करण्यात आलं आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याची माहिती कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कॉलेजच्या डीन यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितले की, स्वप्नीलचे कामात लक्ष लागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू होते आम्ही त्याचं समुपदेशन करत होतो. तसेच रॅगिंग प्रकरणी कोणतीही तक्रार नव्हती असंही त्यांनी सांगितलं. सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न स्वप्नील याने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा उघडकीस आला आहे. इतकेच नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये दोन मुलींची नावे लिहिण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.