• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Narayan Rane EXCLUSIVE: "17 सप्टेंबरनंतर प्रहारमधून टार्गेट करणार" - नारायण राणे

Narayan Rane EXCLUSIVE: "17 सप्टेंबरनंतर प्रहारमधून टार्गेट करणार" - नारायण राणे

Narayan Rane Exclusive interview: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक्स्लुझिव्ह मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑगस्ट : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसेना विरुद्ध राणे आणि भाजप असा वाद पेटला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी न्यूज 18 लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत (Narayan Rane Exclusive Interview with News18 Lokmat) दिली. या मुलाखतीत वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर नारायण राणेंनी उत्तरे दिली आहेत. प्रहारमधून टार्गेट करणार सामनाच्या संपादकीयमध्ये तुम्हाला टार्गेट केलं जात आहे? या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं, मी करेन ना... 17 तारखेनंतर प्रहारमधून टार्गेट करणार. कुठे जाणार ते? कोर्टात केस आहे नंतर करणार. टार्गेट करणार. कशी भाषा बोलायची ना? ते मी त्यांना शिकवेल. "काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय" उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का? काय पत्रकार आहे? कुठे कामाला होते, काय होते आणि काय भाषा बोलतायत. ठिक आहे थोडे दिवस आहे असं म्हणत राणेंनी संजय राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का ? यावर नारायण राणेंनी म्हटलं, विचार करतोय.. तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. मी गुन्हा केलेला नाहीये - नारायण राणे नारायण राणेंनी म्हटलं, प्रसाद लाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना काय म्हणाले होते, तुम्ही थोबाड फोडून टाका. आदेश दिलेले होते. मी कोणतेही आदेश दिलेले नाही. मी क्राईम केलेला नाहीये. मी असतो तिकडे तर असं म्हटलं होतं. याला काहीही अर्थ नाहीये. पण हे थेट थोबाड फोडा, हे करा - ते करा, याला मारा, हे काय आहे... दिवस गेले ते, असे बोलायचे दिवस गेले. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही. मी त्यावर कोर्टात जाणार आहे. पोलिसांच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
  First published: