जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राजनाथ सिंह यांच्यावरुन राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, म्हणाले, तो फोन फक्त..

राजनाथ सिंह यांच्यावरुन राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, म्हणाले, तो फोन फक्त..

राजनाथ सिंह यांच्यावरुन राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, म्हणाले, तो फोन फक्त..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावर आता भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : शिवसेना (shivsena) आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट अशा दोन गटांत पक्ष विभागला गेला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी कार्यकर्ते मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. यादरम्यान, ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह  यांच्याविषयी एक खुलासा केला. ते म्हणाले, की मागे एकदा राजनाथ सिंह  (rajnath singh) यांचा फोन आला होता, त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटलं होतं. आपण भडकल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनीही टीका केली आहे. काय म्हणाले नारायण राणे? केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या फोननंतर उद्धव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले? ते एकटेच घरात होते. त्यामुळे फारफार तर त्यांच्या पत्नींने पाहिले असेल, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना मारलाय. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरे कोण आहेत, त्यांच अस्तित्व काय, त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत नारायण राणे यांनी ठाकरे यांची खाल्ली उडवली आहे. यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी दिली. सॅटरडे क्लबतर्फे आयोजित मराठी उद्योजक दिवस सोहळ्यासाठी नारायण राणे नवी मुंबईत आले होते त्यावेळी ते बोलत होते. राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा काय म्हणाले ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ यांनी फोनवर मला अस्सलाम वालेकुम म्हणून बोलण्यास सुरुवात केली. त्यांची ही भाषा ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या या कृत्यावर भडकल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले, असा खुलासा खुद्द उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहोत. यापूर्वी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात