PHOTOS: मुंबईत भलं मोठं झाडं पडलं, थोडक्यात टळली मोठी जीवितहानी नाहीतर...
झाडं इतकं मोठं होतं की ते पडल्याने दोन रस्ते काही काळा करता बंद झाले होते.
|
1/ 7
ठाण्यात भलं मोठं झाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे, सुदैवाने रात्रीच्या सुमारास झाड पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
2/ 7
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील विश्राम घर सोसायटी, श्री अयप्पा मंदीर श्रीनगर इथं एक मोठं झाडं उन्मळून पडल्याने मोठं नुकसान झालं आहे.
3/ 7
सुदैवाने झाड मध्यरात्री 3 वाजता पडल्याने कोणतिही जीवित हानी झाली नाही. मात्र, हे मोठे झाड पडल्याने या झाडाखाली आल्याने रस्त्यावर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 12 दुचाकी, 2 चारचाकी आणि 1 टीएमसी लाईट पोलचे नुकसान झाले आहे.
4/ 7
झाडं इतकं मोठं होतं की ते पडल्याने दोन रस्ते काही काळा करता बंद झाले होते. पण मध्यरात्री झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.
5/ 7
घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कटरच्या साह्याने झाड कापून आधी रस्ता मोकळा केला आणि नंतर संपुर्ण झाड कापून नेले.
6/ 7
ठाण्यात सिमेंटचे जंगल वाढल्याने जुन्या वर्षानुवर्षे तग धरुन उभी असलेली मोठी वृक्ष पडण्याची संख्या ठाण्यात वाढू लागली आहे.
7/ 7
यामुळे ठाण्यात येऊर जंगल जवळ असुन ही शहरात मात्र हिरवळ हद्द पार झालीये असं म्हणटलं तरी वावगं ठरणार नाही.