जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : आकाशातून पक्षी थेट रस्त्यावर कोसळले, मुंबईतील घटना, काळजी करणारं कारण समोर, Video

Mumbai News : आकाशातून पक्षी थेट रस्त्यावर कोसळले, मुंबईतील घटना, काळजी करणारं कारण समोर, Video

Mumbai News : आकाशातून पक्षी थेट रस्त्यावर कोसळले, मुंबईतील घटना, काळजी करणारं कारण समोर, Video

Mumbai News : वाढत्या उन्हाचा मुंबईतील प्राणी तसंच पक्ष्यांनाही मोठा त्रास होतोय. ‘या’ पद्धतीनं घ्या त्यांची काळजी

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 19 मे : वातावरणामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारी ओस पडत आहेत. उन्हाचा त्रास झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंट्सची संख्या वाढत चाललीय. मुक्या प्राण्यांचेही या उन्हाळ्यात मोठे हाल होतायत. विशेषत: आकाशात स्वच्छंदी वृत्तीनं विहार करणाऱ्या पक्ष्यांना याचा मोठा त्रास होतोय. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पक्षी कोसळण्याच्या घटना दिसतायत. काय होतायत परिणाम? वाढत्या उन्हामुळे या पक्षांच्या शरिरातील पाणी कमी होतंय. त्यामुळे ते झाडावरुन किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत. मुंबईमध्ये मागील दोन दिवसांमध्ये जखमी पक्ष्यांचं प्रमाण वाढलंय. यामध्ये 35 ते 40 कबूतर तर 12 ते 13 घारींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पोपट, बगळे, घुबड हे पक्षी देखील शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं झाडावरुन किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झालेत, अशी माहिती परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) मधील डॉक्टर मयूर डांगर यांनी दिली.

News18लोकमत
News18लोकमत

या पक्ष्यांवर परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भविष्यात तापमानात वाढ झाल्यास याचा पक्षी व प्राण्यांना अधिक फटका बसू शकतो, असा इशाराही डागर यांनी दिला. खई के पान…पण शुगर फ्रीवाला, सोन्याचा वर्ख असलेलं खास मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल, कुठे? पाहा VIDEO पक्ष्यांना पाणी मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहनही डॉ. डांगर यांनी केले आहे. सध्या वाढत्या तापमानाचा पक्ष्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास प्राण्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या. उन्हात गरम झालेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी पिण्यास देऊ नका, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: heat , Local18 , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात