जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर सुरू केला भन्नाट कॅफे, लाडू-रसमलाई मिल्कशेकनं लावलंय सर्वांना वेड, Video

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर सुरू केला भन्नाट कॅफे, लाडू-रसमलाई मिल्कशेकनं लावलंय सर्वांना वेड, Video

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर सुरू केला भन्नाट कॅफे, लाडू-रसमलाई मिल्कशेकनं लावलंय सर्वांना वेड, Video

लॉकडाऊन कॅफे म्हणून मुंबईकर तरुणानं सुरू केलेला उद्योग आता चांगलाच फेमस झालाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 22 फेब्रुवारी : कोरोना व्हायरस आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जगाची घडी विस्कटली. या तडाख्यात अनेकांनी नोकरी गमावली. व्यवसायात नुकसान सहन केला. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर जग पुन्हा एकदा यामधून सावरण्याचा प्रयत्न करतंय. त्याचवेळी याचा फटका बसलेली मंडळी देखील पुन्हा एकदा नव्या जोमानं भरारी घेत आहेत. मुंबईतील ‘राहुल कॅफे’ देखील याचं एक उत्तम उदाहरण आहे. लॉकडाऊनमध्ये जॉब गेला आणि… मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमध्ये राहुल कॅफे आहे.  कॅफे म्हंटलं की चांगलं इंटेरिअर, एसी असेल असं तुम्हाला वाटेल. पण राहुलचा कॅफे साधा आहे. रस्त्यावर एका झाडाखाली सुंदर डिझाईन केलेल्या गाडीमध्ये त्यानं हा कॅफे सुरू केलाय. याच कॅफेत उत्तम प्रकारचे मिल्कशेक्स मिळतात. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि…मुंबईकरांना मिळाला नवा पदार्थ! पाहा Video लॉकडाऊनमध्ये राहुलचा जॉब गेला. त्यानंतर त्यानं घरातूनच मिल्कशेक्स विक्रीला सुरूवात केली. आपल्या घरगुती कॅफेला त्यानं लॉकडाऊन कॅफे असं नाव दिलं. राहुलनं या कॅफेत तयार केलेला मिल्कशेक अनेकांना आवडला. त्याच्याकडं गर्दी जमू झाली. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यानं दादरमधील एका लहानशा गल्लीत कॅफे सुरू केला. त्याचं राहुल कॅफे असं नामकरण केलं. राहुल दिवसभर  दुसऱ्या कंपनीत नोकरी करून संध्याकाळी स्वतःचा कॅफे चालवतो. संध्याकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत राहुलकडे भरपूर ग्राहक येतात.

    News18

    30 पेक्षा जास्त मिल्कशेक राहुलच्या कॅफेमध्ये 30 पेक्षा जास्त मिल्कशेक आहेत. येथील मोतीचूर लाडू आणि रसमलाई असं हटके कॉम्बिनेशन असलेला मिल्कशेक चांगलाच फेमस आहे. त्याचबरोबर मिठाईपासून बनवलेले वेगवेगळे मिल्कशेक ग्राहकांना आवडतात. या कॅफेत स्वच्छतेलाही मोठं महत्त्व आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘सामान्य नागरिक, विद्यार्थी यांच्या खिशाला परवडेल या दरामध्ये मी हे मिल्कशेक विकतो. अनेक जण आवर्जुन या कॅफेत येतात. त्यावेळी खूप भारी वाटतं. मला माझ्या आई आणि बहिणीचा पूर्ण पाठिंबा आहे,’ असं राहुलनं यावेळी सांगितलं. राहुल कॅफे दादर पूर्व भागात स्टेशनपासून  800 मिटर अंतरावर आहे. 50 रुपये ते 200 रुपयांच्या आत वेगवेगळे मिल्कशेक इथं मिळतात.

    गूगल मॅपवरून साभार

    राहुल कॅफेचा पत्ता 26, एस. एस. मार्ग, राधिका साईकृपा को. ऑप. सोसायटी, नायगाव, दादर, मुंबई., महाराष्ट्र,400014.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात