मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) एका तरुणाने कथितपणे प्रेयसीवर नाराज होत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील देवनार (deonar area of Mumbai) परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने कथितपणे आत्महत्या केली आहे. त्याच्या प्रेयसीने फोन न उचलल्याने आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. मृतक तरुणाचे नाव मानव ललवानी असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai youth commits suicide after girlfriend did not pick up phone call)
ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे अधिकारी सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितले की, मृतक तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन रात्री उशीरा घरी परतला. यावेळी त्याची प्रेयसीही त्याच्यासोबत पार्टीत होती. प्रेयसीला सोडून मानव आपल्या घरी झोपण्यासाठी गेला. रात्री जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास त्याने प्रेयसीला फोन केला.
वाचा : Lockdown मध्ये गमावली नोकरी अन् सुरू केली चोरी, पुण्यातील जिम ट्रेनर बनला चोर
10 वेळा केला फोन पण...
प्रेयसीला फोन करुन संपर्क करण्याचा मानवने प्रयत्न केला. 10 वेळा फोन करुनही तिने फोन उचलला नाही. यानंतर त्याने रागाच्या भरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास मानवच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिला आणि त्यांना एकच मोठा झटका बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शवविच्छेदनासाठी मानवचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांना मानवच्या मृतदेहाच्या शेजारी एक मोबाइल फोन आढळून आला.
वाचा : कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेत केला जीवनाचा शेवट
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
पोलिसांच्या मते, जेव्हा मानवने प्रेयसीला फोन केला तेव्हा ती झोपली होती आणि त्यामुळे मानवचा फोन तिने उचलला नाही. मात्र, प्रेयसीने फोन न उचलल्याने मानवला संशय आला आणि त्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती घेतले असून त्याद्वारे अधिक तपास करत आहेत.
मुलीची प्रतिक्रिया अद्याप नाही
या प्रकरणात प्रेमिकाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, पोलिसांच्या तपासात जर तिच्याविरोधात काही पुरावे मिळाले तर तिच्याविरोधात गुन्हा दाखल होई शकतो. दरम्यान, मानवच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना एक मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Suicide