Home /News /kolhapur /

कोल्हापुरात 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेत केला जीवनाचा शेवट

कोल्हापुरात 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेत केला जीवनाचा शेवट

Suicide in Kolhapur: शिरोळ तालुक्यातील दत्तवाड याठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या (Minor female student commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

    कोल्हापूर, 11 डिसेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाड याठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या (Minor female student commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी कोणी नसताना, संबंधित मुलीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संध्या अरिहंत सवळे असं आत्महत्या करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचं नाव आहे. तिने शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी कोणी नसताना तिने घरातील आड्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अल्पवयीन मुलीनं अशाप्रकारे जीवनाचा शेवट केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. हेही वाचा-क्रीडाविश्व हादरलं! सराव संपताच सुरू झाला त्रास; क्रिकेटपटूचा हृदयद्रावक शेवट तिने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 'आई वडील किती दिवस पैसे देणार', विवंचनेतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं संपवलं जीवन दुसऱ्या एका घटनेत, बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या (Student commits suicide) केली आहे. 24 वर्षीय मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची (Competitive exam) तयारी करत होता. पण त्याला परीक्षेत आणि नोकरीत अपेक्षित यश मिळत नव्हतं. तसेच आई वडिलांनी आपल्यावर आणखी किती दिवस खर्च करायचा, याची चिंता त्याला सतावत होती. यातूनच नैराश्य आल्याने तरुणाने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. हेही वाचा-फावडं डोक्यात घालून पाडला रक्ताचा सडा, कोल्हापुरात मुलाकडून बापाची निर्घृण हत्या योगेश समाधान माळेकर असं आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो चिखली तालुक्यातील अंत्री खेडकर गावातील रहिवासी होता. मृत योगेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत, ठिकठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काही नोकरी मिळत नव्हती. अशात घरी एकुलत्या एक बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे आई वडील आणखी किती दिवस आपला खर्च उचलतील. याची चिंता योगेशला लागली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Suicide

    पुढील बातम्या