मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुलाच्या मृतदेहावरील जखमांवर माऊलीने रात्रभर केले उपचार, त्याने जीव गमावल्याचं सकाळी आलं लक्षात

मुलाच्या मृतदेहावरील जखमांवर माऊलीने रात्रभर केले उपचार, त्याने जीव गमावल्याचं सकाळी आलं लक्षात

मुंबईतील (Mumbai) कलिना (Kalina area) भागात एक धक्कादायक प्रकार उघड आलाय. या भागातील एक 70 वर्षांची महिला तिच्या 42 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ (Son's body) रात्रभर झोपून होती.

मुंबईतील (Mumbai) कलिना (Kalina area) भागात एक धक्कादायक प्रकार उघड आलाय. या भागातील एक 70 वर्षांची महिला तिच्या 42 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ (Son's body) रात्रभर झोपून होती.

मुंबईतील (Mumbai) कलिना (Kalina area) भागात एक धक्कादायक प्रकार उघड आलाय. या भागातील एक 70 वर्षांची महिला तिच्या 42 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ (Son's body) रात्रभर झोपून होती.

मुंबई, 25 फेब्रुवारी:  मुंबईतील (Mumbai) कलिना (Kalina area) भागात एक धक्कादायक प्रकार उघड आलाय. या भागातील एक 70 वर्षांची महिला तिच्या 42 वर्षांच्या मुलाच्या मृतदेहाजवळ रात्रभर झोपून होती. इतकंच नाही तर आपल्या मुलाला दुखापत झाल्याचं समजून तिनं त्याच्यावर उपचार देखील केले. हे कुटुंब मेघालयातील असल्याची माहिती आहे. या महिलेच्या मुलाचा रात्री बाथरुममध्ये घसरुन मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण?

या विषयावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या आई देखील अंथरुणाला खिळलेल्या आहेत. त्यांचा मुलगा सोमवारी रात्री बाथरुममध्ये घसरुन पडल्याचं त्यांच्या काही वेळानं लक्षात आलं. मुलगा काहीच हलचाल करत नाही हे जाणवल्यानंतर तो आजारी आहे, अशी त्यांची समजूत झाली. त्यांनी मुलाचा मृतदेह तो जिवंत असल्याचं समजून ओढत स्वत:च्या बेड जवळ आणला.

या महिलेनं मुलाच्या जखमांवर रात्रभर उपचार देखील केले. सकाळी देखील मुलगा काही हलचाल करत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्य नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.

(हे वाचा : पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती )

लॉकडाऊनमध्ये गेली होती नोकरी

मृत व्यक्तीची नोकरी कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus)  करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गेली होती. त्यानंतर त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. या प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर, ‘या घटनेची नोंद अपघाती मृत्यू (accidental death) अशी करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.’ अशी माहिती वाकोला विभागाचे असिस्टंट कमिशनर अविनाश धर्माधिकारी यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Dead body, Heartbreaking, Maharashtra, Mother, Mumbai, Son