जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जालना क्राईम: एकाच दिवशी जिल्ह्यात दोन विचित्र घटनांची नोंद, वाचा सविस्तर

जालना क्राईम: एकाच दिवशी जिल्ह्यात दोन विचित्र घटनांची नोंद, वाचा सविस्तर

जालना क्राईम: एकाच दिवशी जिल्ह्यात दोन विचित्र घटनांची नोंद, वाचा सविस्तर

जालना (Jalna Crime) मध्ये गुरुवारी दोन मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. वाचा सविस्तर.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 18 जून: जालना (Jalna Crime) मध्ये युनियन बँकेच्या कृषी अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून (Beating)मारहाण केल्याची माहिती समोर येतेय. शहरापासून जवळच असलेल्या कोठारी हिल्सजवळ ही घटना घडली. जालन्यात रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वारांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. गणेश बोरसे असं या कृषी अधिकाऱ्याचे नाव असून तो गुरुवारी संध्याकाळी बँकेतून घराकडे जात असताना कोठारी हिल्सजवळ दुचाकीवर ट्रीपलसीट आलेल्या अज्ञातांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18

दरम्यान जिल्ह्यात दुसरीही मारहाणीची घटटना घडली आहेत. पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह अधिकारी आणि शिपायांकडून शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. भोकरदन शहरात ही घटना घडली आहे. जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपायांनी पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे. दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील रहिवासी आहे. पीककर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता. बँकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असताना शिपायाने बँकेचे गेट बंद केलं आणि आता वेळ संपली उद्या या असं सांगितलं. यावरून या शेतकऱ्याने मॅनेजरकडे पीककर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली. हेही वाचा-  12 वीच्या निकालाबाबत राज्याचा फॉर्म्यूला आज निश्चित होणार? यावेळी शिपाई आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आता होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात