जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : मुंबईत लोकलने कुठेही फिरा फक्त 50 रुपयांमध्ये, तेही तिन्ही मार्गावर! पाहा हा VIDEO

Mumbai News : मुंबईत लोकलने कुठेही फिरा फक्त 50 रुपयांमध्ये, तेही तिन्ही मार्गावर! पाहा हा VIDEO

Mumbai News : मुंबईत लोकलने कुठेही फिरा फक्त 50 रुपयांमध्ये, तेही तिन्ही मार्गावर! पाहा हा VIDEO

मुंबईत लोकलने 50 रुपयांमध्ये या तिकिटाद्वारे फिरता येते. या तिकिटाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 30 मे : मायानगरी मुंबईचे सर्वांना आकर्षण आहे. यामुळे देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. मुंबईच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यत पोहोचिवण्याचे काम म्हणून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवर आहे. या लोकल सेवेपासून पर्यटक सुद्धा खूप आकर्षित झालेले पाहिला मिळतात. देशविदेशातून मुंबईमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना सारखे तिकीट काढावे लागू नये आणि त्यांना पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी रेल्वेकडून ‘पर्यटन तिकीट’ संकल्पना राबवण्यात येते. पर्यटन तिकीट विक्रीला सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. एका तिकिटीत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर फिरता यावे म्हणून रेल्वेने पर्यटन तिकीट संकल्पना 2016 पासून आणली आहे. पर्यटक तिकिट उन्हाळा, दिवाळी आणि ख्रिसमस सुट्टीच्या कालावधीत या तिकीट विक्रीच्या खप वाढताना दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर 2022-23 या आर्थिक वर्षात 82 हजार 595 तिकिटांवर 4 लाख 6 हजार 334 पर्यटकांनी प्रवास केला. त्यातून 1 कोटी 28 लाख 57 हजार 998 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर एप्रिल महिन्यात 6 हजार 454 तिकिटांवर 36 हजार 132 पर्यटकांनी प्रवास केला. त्यातून 9 लाख 99 हजार 136 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकलची पर्यटकांना भुरळ पडल्याचे दिसून येते आहेत.

वडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी

पर्यटक तिकिटाचे भाडे किती? पर्यटक तिकीट दोन विभागात आहे. एक म्हणजे प्रथम श्रेणी आणि दुसरी द्वितीय श्रेणी अश्या दोन श्रेणी मधून तिकीट विक्री केली जातात. विशेष म्हणजे या पर्यटक तिकिटाचे भाडे प्रौढ आणि लहान मुलांसाठी वैगवेगळे आहेत. साधारणता प्रथम श्रेणीची तिकीट कमीत कमी कमी 260 ते जास्ती जास्त 555 पर्यत आहेत. तर द्वितीय श्रेणीच्या या तिकिटांची किंमत कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 150 रुपये इथं पर्यत आहे. याशिवाय वातानुकूलित लोकलचे तिकीट दर 340 ते जास्ती जास्त 615 रुपये आहे. विशेष म्हणजे ही तिकीट लहान मुलांसाठीही घेता येत असून त्यासाठीचे कमीत कमी शुल्क आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात