ओला-उबरनंतर आता मुंबईतील टॅक्सीचालक जाणार संपावर

ओला-उबरनंतर आता मुंबईतील टॅक्सीचालक जाणार संपावर

टॅक्सी महासंघाच्या या भूमिकेमुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या अडचणींत भर पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : सरकारने ओला आणि उबर चालकांच्या मागण्या न केल्यास  दिवाळीच्या काळात पन्नास हजाराहून अधिक टॅक्सी चालक संपावर जाणार आहेत. ‘जय भगवान’ या टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांनी ही घोषणा केली आहे. टॅक्सी महासंघाच्या या भूमिकेमुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांच्या अडचणींत भर पडणार आहे.

मागील 6 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या ओला आणि उबर चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी टॅक्सी महासंघाने ही घोषणा केली आहे. सरकारने ओला-उबर चालकांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास काळी पिवळी टॅक्सी ओला-उबर चालकांच्या मदतीला धावून येईल, असं बाळासाहेब सानप यांनी म्हटलं आहे.

तसंच सरकानं अॅपवर आधारित टॅक्सी संदर्भात योग्य ती भूमिका घ्यावी. नाहीतर काळी पिवळी टॅक्सी चालक संपावर जातील, असा इशारा जय भगवान टॅक्सी महासंघाने दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील पन्नास हजाराहून अधिक टॅक्सीचालक हे जय भगवान या टॅक्सी महासंघाशी जोडले गेलेल आहेत, असा दावा महासंघाचे संस्थापक बाळासाहेब सानप यांनी केला.

ओला आणि उबर चालकांच्या संपावर सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल. अन्यथा सणाच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  LIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 08:32 AM IST

ताज्या बातम्या