• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईत कौटुंबिक वादामुळे MLAच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईत कौटुंबिक वादामुळे MLAच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्या करणाऱ्या महिलेची चौकशी केली असता ती आमदाराची पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 मे: मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सकाळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं एका महिलेला आत्महत्या करण्यापासून थांबवलं होतं. मात्र आत्महत्या करणाऱ्या महिलेची चौकशी केली असता ती आमदाराची (MLA) पत्नी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं (Mankhurd traffic police) नियोजन करत होते. त्याचवेळी एका दुचाकी चालकानं एका महिला ब्रीजच्या कठड्यावर चढली असून ती रडत असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन तसंच नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर ढगे यांनी संवदेनशीलता लक्षात घेऊन महिलेशी चर्चा करुन युक्तीनं खाली उतरवत आत्महतेपासून परावृत्त केलं. त्यानंतर त्या महिलेला मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे पोलिसांनी चौकशी केली असता आपण आमदाराची पत्नी असल्याचं त्या महिलेनं सांगितलं. कौटुंबिक वादामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमदाराच्या पत्नीला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आलं.
  Published by:Pooja Vichare
  First published: