Home /News /mumbai /

Mumbai Sindhudurg विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद; मुंबई-सिंधुदुर्ग तिकीट Booking Full

Mumbai Sindhudurg विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद; मुंबई-सिंधुदुर्ग तिकीट Booking Full

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Mumbai Sindhudurg flight ticket booking: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी नागरिकांनी तिकीट बुकिंग केली आहे.

    मुंबई, 24 सप्टेंबर : कोकणातील (Konkan) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे (Chipi Airport Sindhudurg) उद्घाटन पुढील महिन्यात होणार आहे. बहुचर्चित आणि प्रतिक्षित असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वीच प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. विमान सेवेसाठी नागरिकांनी तिकीट बुकिंगला (Flight ticket booking) सुरुवात केली आणि अवघ्या तासाभरातच तिकीट बुकिंग फुल्ल झाले आहे. 20 ऑक्टोबरपर्यंतचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले असल्याने आता तुम्हाला जर कोकणात विमानाने जायचे असेल तर 20 ऑक्टोबरचा महुर्त मिळेल. (Mumbai Sindhudurg flight tickets booking full) एअर इंडियाकडून एलायन्स एअर कंपनीमार्फत मुंबई - सिंधुदुर्ग (Mumbai - Sindhudurg) आणि सिंधुदुर्ग - मुंबई (Sindhudurg - Mumbai) अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एअर इंडियाने उद्घाटनापूर्वीच तिकीट बुकिंग सुरू केली आणि अवघ्या एका तासात तिकीट पूर्णपणे बूक झाली. प्रवाशांकडून मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे आगामी काळात विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची नक्कीच वाढ होईल यात शंका नाही. किती आहे तिकीट दर? (Mumbai - Sindhudurg flight ticket rate) मुंबई ते सिंधुदुर्ग या विमान प्रवासासाठी साधारण 2520 रुपये इतके तिकीटाचे दर आहे. तर सिंधुदुर्ग ते मुंबई या विमान प्रवासासाठी 2621 रुपये तिकीट आहे. Chipi Airport: चिपी विमानतळ श्रेयवादावरुन रंगलं राजकारण, शिवसेना आणि भाजपचा 'सामना' मुंबई - सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग विमान प्रवासाला किती वेळ लागणार? मुंबईहून सिंधुदुर्गात उड्डाण करणारे विमान हे सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण करेल आणि दुपारी साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर लँड करेल. यासोबतच सिंधुदुर्ग ते मुंबई या प्रवासासाठी चिपी विमानतळावरून दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी विमान उड्डाण करेल. चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल. उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण 286 हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यासाठी सुमारे 520 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात आयआरबी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी भाडेतत्वावर (लीजवर) हे काम देण्यात आले आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीने 14 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Air india, Mumbai, Sindhudurg

    पुढील बातम्या