मुंबई, 8 सप्टेंबर : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन (Chipi Airport Inauguration) येत्या 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, आता या विमानतळाच्या श्रेयवादावरुन चांगलेच राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असल्याचं जाहीर केलं. यापूर्वी विनायक राऊत यांनी उद्घाटन 7 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं म्हटलं होतं. या विमानतळाच्या उद्घाटनासोबतच श्रेयवादावरुनही राजकारण तापलं आहे. (Shiv Sena vs BJP over Chipi Airport credibility)
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, चालत्या गाडीत शिरण्याचा प्रयत्न म्हणजे विनायक राऊत आहेत. चालत्या गाडीत शिरल्याने श्रेय मिळत नाही. जर तुमचं श्रेय होतं तर गेल्या 15 वर्षांत विमानतळाचं उद्घाटन का नाही झालं. जर तुमची मेहनत होती तर गेली दोन वर्षे तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून का बसला होतात. राणेंचा पाठपुरवठा आणि भाजप याआधारावर कोकणवासीयांना ही सेवा मिळणार आहे.
'उद्घाटनाला मुख्यमंत्री असावे असं थोडी', नारायण राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, मी ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो आणि विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावणार का? यावर राणेंनी म्हटलं होतं, मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही.
राणेंच्या या पत्रकार परिषदेनंतर आज खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, बहुचर्चित चिपी विमानतळाची प्रतिक्षा सर्वांनाच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी चार बैठका घेतल्या, वेळोवेळी चार हवाई वाहतूक मंत्री यांच्याशी सात वर्षात वेळोवेळी बैठका घेतल्या. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीच अकरा वाजता फोनवर चर्चा केली. हे विमानतळ हे महाराष्ट्र एमआयडीसीते आहे केंद्र सरकार फक्त लायसन्स देण्याचं काम करत आहे. नारायण राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. फुशारकी मारताना थोडे तरी भान ठेवा, उद्घाटन करताना 22 वर्षे झाली. इतकी वर्षे राणे कोठे होते? असा सवालही त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.