लखनऊ, 03 जून : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कारण, खीरी – गोला येथे असलेल्या इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला अज्ञात व्यक्तिनं बुरखा घातला. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्ते प्रचंड भडकले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. घटनास्थळी धाव घेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंगामा देखील केला. शिवाय, जोरदार घोषणाबाजी देखील केली. पण, पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर पोलिसांनी पुतळ्यावर घातलेला बुरखा उतवला असून परिस्थितीवर देखील नियंत्रण मिळवलं आहे. हे कृत्य नेमकं केलं कुणी? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. त्यादृष्टीनं आता तपासाला देखील सुरूवात करण्यात आली आहे.
VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक