मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांचा टीमला यश आलं आहे. यामध्ये पोलिसांनी बॉलिवूडमधील आंतरराष्ट्रीय बेली डान्सरसह दोन टीव्ही मालिकेतील अभिनेत्रींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका 5 स्टार हॉटेलमध्ये दोन मालिकांमधील अभिनेत्रींचा 10 लाखांसाठी सौदा केला जात असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडलं आहे.
गोरेगावमधील 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर केलं आणि ग्राहक म्हणून या ठिकाणी सापळा रचला आणि इथे चालू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला आणि या संपूर्ण घटनेचा भांडाफोड केला.
हे वाचा-चीन आणि रशियाबरोबर भारताच्या हवेलाही ट्रम्पनी ठरवलं वाईट, नेमकं काय आहे सत्य?
या प्रकरणी पोलिसांनी राखी सावंतची मैत्रिण आणि बॉलिवूडची अभिनेत्री हिच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांनी कसा केला पर्दाफाश
पोलिसांच्या एका टीमला हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं होतं. ही टीम मुलींचा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भेटणार होती. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. 10 लाखांचा सौदाही पक्का झाला आणि त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात देहव्यापर करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलं आहे. यामध्ये राखी सावंतची मैत्रिण सापडल्यानं मोठी खळबळ उडाल्याची माहिती मिळाली आहे.