• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, तपासात समोर आली धक्कादायक माहिती

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai sakinaka rape case: आरोपी हा ड्रग्ज अॅडिक्ट आहे का याचाही तपास सुरू आहे.

  • Share this:
मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ (Mumbai Woman raped in Sakinaka) उडाली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेप्रमाणे ही घटना घडली आहे. पीडित महिलेवर राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचार सुरू असून आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पीडितेच्या आईने म्हटलं... पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी रुग्णालयात जाऊन केली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली की, पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक आहे, अत्यावस्थ अवस्थेत पीडिता आहे. पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, गेली 10-12 वर्षांपासून जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्यासोबत राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले. पुण्यानंतर मुंबई हादरली! 'निर्भया'प्रमाणे बलात्कार ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पीडित महिला रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पोत आढळून आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. पीडिता व्हेंटिलेटरवर असून तिच्यावर उपचारासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. इतकी क्रुरता पुरुषांमध्ये का आणि कशी येते? असा प्रश्न आहे. सर्वांना भय वाटणं स्वाभाविकच आहे. आरोपी हा ड्रग्ज अॅडिक्ट आहे का याचाही तपास सुरू आहे. पीडितेला 13 आणि 16 वर्षांची अशा दोन मुली आहेत, ज्या पीडितेच्या आई बरोबर राहत आहेत. पीडित महिला ही आरोपीसोबत राहत होती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.
Published by:Sunil Desale
First published: