Home /News /mumbai /

पुण्यानंतर मुंबई हादरली! 'निर्भया'प्रमाणे बलात्कार करून तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातला रॉड

पुण्यानंतर मुंबई हादरली! 'निर्भया'प्रमाणे बलात्कार करून तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातला रॉड

तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जात आहे.

    मुंबई, 10 सप्टेंबर :  कुठेही घडणाऱ्या बलात्काराच्या (Rape) घटना या चीड वाढविणाऱ्याच असतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातही बलात्काराची घटना समोर आली होती. आज मुंबईत झालेल्या घृणास्पद कृत्याने मात्र सर्व सीमा ओलांडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामुळे अख्खा देश हादरला होता. तशीच घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली आहे. मुंबईत (Mumbai Rape Case) एका महिलेसोबत नवी दिल्लीतील निर्भया प्रमाणे भयावह प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही महिला 30 वर्षांची आहे. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंतर्गत अवयवांना जखमा (Internal Injury) झाल्या आहेत. त्याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगात रॉड (put a rod in the private part of the girl ) घातल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरू आहे. मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी अटकेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील साकीनाका परिसरातील आहे. येथे एका आरोपीने महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला. या बाबात माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात IPC सेक्शन्स 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. (After rape put a rod in the private part of the girl ) हे ही वाचा-किळसवाणा प्रकार! सिरिंजमध्ये वीर्य भरून भर दुकानासमोर महिलेच्या कमरेवर टोचलं आरोपीची चौकशी सुरू सध्या पोलीस पकडलेल्या आरोपीची चौकशी करीत आहे. आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकरणात आणखी जणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपीसोबत कडक चौकशी केली जात आहे. महिलेची हालत बघून दिल्लीतील निर्भय हत्याकांडाची आठवण येत आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Nirbhaya gang rape case, Rape

    पुढील बातम्या