विजय वंजारा (मुंबई) 21 डिसेंबर : मुंबई कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना गुन्हे शाखा युनिट 12 ने कुर्ला परिसरातून तीन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. यामध्ये डझनभर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही स्त्रिया अतिशय हुशार आहेत. त्या निर्जन समाजात दिवसाढवळ्या घुसतात आणि चोरी करून पळून जातात. गुन्हे शाखेने त्यांच्याकडून चोरीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजारांची रोकड जप्त केली आहे.
सुजाता शंकर सकट (35), सारिका शंकर सकट (30) आणि मिना उमेश इंगळे (28) अशी अटक करण्यात आलेल्या तीन बहिणींची नावे आहेत.
हे ही वाचा : शिक्षक आहे की सैतान? 10 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत पहिल्या मजल्यावरुन फेकलं; आईसोबतही..
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र लादुलाल बुधागर नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये ठेवलेले 37 लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोकड सुमारे 4 लाख 86 हजारच्या चोरीची तक्रार कस्तुरबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित महिला दिसल्या घरात घुसून चोरी करणाऱ्या याच महिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान कॅमेऱ्यात दिसणारी महिला ऑटोरिक्षात चढताना दिसली. पोलिसांनी सदर ऑटोरिक्षाची माहिती काढल्यानंतर महिलेचा ठावठिकाणा शोधून काढला. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सपोनि रासकर, मापोनि शेख, पोहे बागवे, मापोह पाटील यांच्या पथकाने त्या महिलांना कुर्ला परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली.
या तिघांना अटक केल्यानंतर त्यांना कस्तुरबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच जप्त केलेले दागिने व पैसेही ताब्यात दिले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींविरुद्ध वनराई पोलीस स्टेशन, विक्रोळी पोलिस स्टेशन, मुलुंड, डोंबिवली, जुहू, सांताक्रूझ, कांदिवली, घाटकोपर, ठाणे नगर पोलीस स्टेशनसह सर्व महिलांवर डझनभर गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा : पत्नीच्या प्रियकराचं ते वाक्य जिव्हारी लागलं, औरंगाबादमधील पतीनं उचललं धक्कादायक पाऊल
तपासात या चोरट्या महिला बहिणी असल्याचे समोर आले आहे. या बहिणी कुर्ल्याच्या रहिवासी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चोरीचे काम करते. या सर्वांवर मुंबईतील डझनभर पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.