मुंबई, ठाणे आणि उपनगरांत मध्यम ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळला असून किनारी भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
अत्यावश्यक नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.