मुंबई, 07 सप्टेंबर : मुंबईसह उपगरांत पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. मागच्या तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटेपासून पुन्हा एकदा काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई- ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली. पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तास या भागात ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कोकण किनारपट्टी काही भागात ही पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. पावसाचा जोर तळकोकणात वाढण्याची शक्यता असल्यानं मासेमारी करणाऱ्यांना आणि समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वाचा- कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ‘ही’ सेवा ठरत आहे उपयोगी रविवारी रात्री पुणे-सोलापूर मार्गावर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पावसाने हजेरी लावली असून वाऱ्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील जाउबाची वाडी इथे झाडे उन्मळून पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जेसीबीच्या मदतीनं यवत पोलिस आणि गावकऱ्यांच्या मदतीने पुणे सोलापूर महामार्गावरील झाडे बाजूला करण्यात महामार्ग पोलिसांना यश आलं. दोन वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.