Home /News /mumbai /

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रिलायन्स हॉस्पिटलने उभी केली लहान मुलांसाठी विशेष सुविधा

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रिलायन्स हॉस्पिटलने उभी केली लहान मुलांसाठी विशेष सुविधा

Coronavirus तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता Sir H N Reliance Foundation Hospital च्या वतीने मुंबई कोविड रुग्णांसाठी सुविधा वाढवल्या असून त्यामध्ये लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.

    मुंबई, 21 मे: कोरोनाव्हायसरची दुसरी लाट सरत नाही तोवर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असू शकते, असं ही तज्ज्ञ सांगत आहेत. त्या दृष्टीने देशरात टास्क फोर्स कार्यरत झाले आहेत. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनेही या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने (Sir H N Reliance Foundation Hospital) आपल्या कोविड सुविधा वाढवल्या असून त्यामध्ये लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. Covid-19 ची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. आतासुद्धा लहान कोविड रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. रिलायन्स फाउंडेशन (RFH) त्यामुळे रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्ड (paediatric coverage) तयार ठेवला आहे.  सध्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलतर्फे मुंबईत वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये असलेलं कोविड केअर सेंटर चालवलं जातं. वरळीच्या या सेंटरवर 650 बेड्सची सोय RF तर्फे केली गेली आहे. तिथले 100 बेड यापुढे आता लक्षणं नसलेल्या लहान मुलांसाठी ठेवले जातील. 20 बेड ICU केअरसाठी असतील, अशी माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहे. या ICU beds मध्ये मोठ्यांप्रमाणे लहान मुलांसाठी खास तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पॅडिअॅट्रिक व्हेंटिलेटर्ससुद्धा आहेत. याशिवाय मॉनिटरिंग मशीन, डायलिसीस सपोर्ट, ऑक्सिजन पुरवठा अशी सगळी सोय करण्यात आली आहे. या सगळ्याचं मॉनिटरिंगसाठी टेलि ICU सेंटरसारख्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.  वरळी स्पोर्ट्स क्लबलरच्या या कोविड सेंटरवर रुग्णांसाठी सर्व उपचार मोफत केले जातात. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने त्यासाठी 500 डॉक्टर, आरोग्यसेवकांची टीम तैनात ठेवण्यात आली आहे. वैद्यकीय साधनं, व्हेंटिलेटर वगैरेची सगळी व्यवस्था RF च्या वतीने करण्यात आली आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या, "कोविड काळात त्रास सोसावा लागलेल्या सर्व कुटुंबांच्या वेदना आम्हाला समजतात. आमच्याकडून होईल ती सर्व मदत आम्ही देत राहू. देशाच्या Covid-19 विरोधातल्या लढ्यात पूर्ण शक्तीनिशी साथ द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या परिस्थितीत लहान मुलं आणि मोठ्यांसाठी क्रिटिकल केअर सुविधा वाढवण्याची गरज लक्षात घेऊन पेडिअॅट्रिक ICU निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत आघाडीवर राहून सेवा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना माझा सलाम. आपण सर्व मिळून हे  साथीचं आव्हान परतवून लावू या." RFH च्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या ट्रायडंट हॉटेलमध्येही 100 बेड्स ची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तिथे सौम्य लक्षणं किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांवर इलाज केला जात आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Reliance, Reliance group

    पुढील बातम्या