मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही आठवड्याला खाता इतकं Plastic, वाचून बसेल शॉक!

तुम्ही आठवड्याला खाता इतकं Plastic, वाचून बसेल शॉक!

आपल्या आरोग्यावर प्लास्टिकचा गंभीर परिणाम होत असल्याचं (Plastic packaging affects health) समोर आलं आहे. या प्लास्टिकच्या पॅकेजिंगमधल्या पदार्थांसोबत आपल्या शरीरातही प्लास्टिक (How much plastic you eat) जात असल्याचं एका संशोधनामध्ये स्पष्ट झालंय.

पुढे वाचा ...

    मुंबई, 1 ऑक्टोबर : आजकाल बहुतांश खाद्यपदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात. मिनरल वॉटरच्या बाटल्या, कॉफी-चहाचे कप, नूडल्स किंवा सूपसाठी वापरण्यात येणारे बाउल अशा कित्येक गोष्टी प्लास्टिकच्या असतात. या सर्व वस्तू वापरताना आपल्याला काही वाटत नसलं, तरी आपल्या आरोग्यावर त्यांचा गंभीर परिणाम होत असल्याचं (Plastic packaging affects health) समोर आलं आहे. या प्लास्टिकच्या पॅकेजिंगमधल्या पदार्थांसोबत आपल्या शरीरातही प्लास्टिक (How much plastic you eat) जात असल्याचं एका संशोधनामध्ये स्पष्ट झालंय.

    डीडब्ल्यूने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, दर आठवड्याला एक व्यक्ती साधारणपणे पाच ग्रॅम मायक्रोप्लास्टिक (Microplastic you eat in a week) नकळतपणे खाते. म्हणजेच, एखाद्या क्रेडिट कार्डमध्ये जेवढे प्लास्टिक असेल, तेवढं आपण आठवड्यात खात आहोत. याच हिशोबाने दहा वर्षांमध्ये आपण साधारणपणे अडीच किलोहून अधिक प्लास्टिक खात (How much plastic you eat in lifetime) असल्याचं रॉयटर्सच्या एका वृत्तात म्हटलं आहे. अशाच प्रकारे आयुष्यभराचा हिशेब लावला, तर आपण तब्बल 20 किलो प्लास्टिक खातो असं म्हटलं जात आहे.

    आपल्या शरीरात हे प्लास्टिक कसं जातं याबाबत अल जझिराने एका वृत्तामध्ये माहिती दिली आहे. WWFच्या हवाल्याने दिलेल्या या अहवालात म्हटलं आहे, की पाणी आणि खाद्यपदार्थांमार्फत आपल्या शरीरात मायक्रोप्लास्टिक (Microplastic you eat through food) जातं. एवढंच नाही, तर हवेतही प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म असे कण असतात, जे श्वासामार्फत आपल्या शरीरात जातात. याचा सर्वांत मोठा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो, असंही या अहवालात म्हटलं आहे.

    जगातलं एक तृतियांश प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरण्यात येतं. जर्मनीमध्ये एक व्यक्ती वर्षाकाठी सुमारे 38 किलो प्लास्टिक कचरा (How much plastic waste you make) निर्माण करते. युरोपातली एक व्यक्ती वर्षाकाठी 24 किलो प्लास्टिक कचरा निर्माण करते. प्लास्टिकच्या वापरासाठी ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. या उत्पादनांसाठी लागणाऱ्या पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करण्यात येतो.

    प्लास्टिक डिकम्पोज होण्यासाठी कित्येक वर्षांचा (Time needed to decompose plastic) कालावधी लागतो. प्लास्टिकची एक बाटली नष्ट होण्यासाठी 100 वर्षांहून अधिक कालावधी लागू शकतो. प्लास्टिक बॅग नष्ट होण्यासाठी तर तब्बल 500 वर्षांचा कालावधी लागू शकतो. एकूणच प्लास्टिक हे पृथ्वीसाठी घातक आहे. अशात आपल्या शरीरात ते जात असेल, तर त्याचे किती गंभीर परिणाम होत असतील हे आपण ओळखूच शकता.

    First published:
    top videos

      Tags: Plastic