मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोरोनाला रोखण्यात धारावीकर आघाडीवर, पुन्हा एकदा शून्य रुग्णाची नोंद

कोरोनाला रोखण्यात धारावीकर आघाडीवर, पुन्हा एकदा शून्य रुग्णाची नोंद

एकेकाळी मुंबईतील (Mumbai Corona Virus) कोरोनाचं हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एकेकाळी मुंबईतील (Mumbai Corona Virus) कोरोनाचं हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एकेकाळी मुंबईतील (Mumbai Corona Virus) कोरोनाचं हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई, 04 सप्टेंबर: एकेकाळी मुंबईतील (Mumbai Corona Virus) कोरोनाचं हॉटस्पॉट (Mumbai Corona Hotspot) ठरलेल्या धारावीतून (Dharavi) दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या (Corona First Wave) लाटेत धारावी हॉटस्पॉट (Dharavi Hotspot) ठरला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave) धारावीनं करुन दाखवलं. धारावीकरांनी कोरोनाला रोखण्यात आघाडी मिळवली आहे.

दुसऱ्या लाटेदरम्यान शुक्रवारी सोळाव्यांदा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यासोबतच दादर आणि माहिममध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. शुक्रवारी दादरमध्ये 6 तर माहिममध्ये 8 रुग्ण आढळून आले.

धारावीमध्ये याआधी 14,15, 23 जून त्यानंतर 4, 7, 17 जुलै या दिवशी एकही रुग्ण सापडला नाही. नंतर ऑगस्ट महिन्यात 3, 8, 11, 12, 15, 17,18, 24, 27 धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता.

बोईसरमध्ये जखारिया कंपनीत मोठा स्फोट, चार गंभीर जखमी

सध्या धारावीत जसलोक रुग्णालय आणि सिटी बँकच्या माध्यमातून विशेष मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 47 हजार 90 जणांचे तर पालिकेकडून 49 हजार 506 असे एकूण 96 हजार 596 जणांचे लसीकरण झालं आहे.

मुंबईत नव्या 422 रुग्णांची नोंद

शुक्रवारी मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (corona new patient) आकडा वाढलेला दिसला. काल 422 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 15 हजार 987 वर पोहोचला आहे.

शुक्रवारी नोंद झालेल्या मृतांपैकी तिघांना ही दीर्घकालीन आजार होते. तीनपैकी 2 पुरुष 1 महिला रुग्ण होते. मुंबईत कोरोना बाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या 7,45,434 वर पोहोचली आहे.

देशातल्या सर्वांत मोठ्या कार कंपनीला धक्का, उत्पादन थेट 40 टक्क्यांनी होणार कमी!

 शुक्रवारी दिवसभरात 303 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे मुंबईत सध्या 3,532 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus, Dharavi