Home /News /mumbai /

मुंबईत बसून अमेरिकेतल्या लोकांना घातला गंडा, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईत बसून अमेरिकेतल्या लोकांना घातला गंडा, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

अस्सखलीत इंग्रजी आणि अमेरिकन उच्चार यामुळे लोक यांना बळी पडत होते. त्यामुळे काही लाख रुपयांना या भामट्यांनी गंडा घातला आहे.

मुंबई 07 ऑक्टोबर:  मुंबईत बसून अमेरीकेच्या लोकांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. फेक इंटरनॅशनल कॉल सेंटर उघडून हे भामटे लोकांना फसवत होते. या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. या टोळीने अमेरिकन नागरिकांचे फोन नंबर्स मिळवले होते. ही मंडळी मुंबईतून फोन करून अमेरिकन लोकांना थापा देत असे. आम्ही FBI मधून बोलतोय तुमच्या गाडीत ड्रग्स सापडलेत, तुमची गाडी जप्त केलीये, तुमच्या गाडीचे कागदपत्रे बनावट आहेत अशी विविध कारणे सांगून अमेरिकन नागरिकांना घाबरवत आणि नंतर मग सेटलमेंटच्या नावाखाली त्यांच्याकडून ही टोळी पैसे उकळत होती. अस्सखलीत इंग्रजी आणि अमेरिकन उच्चार यामुळे लोक यांना बळी पडत होते. त्यामुळे काही लाख रुपयांना या भामट्यांनी गंडा घातला आहे. कांदिवली पोलिसांनी गोराईमधून या टोळीला अटक केली असून चार जणांची ही टोळी आहे यांत उमेश पारेख, आदील हुसेन आडवाणी, जिनेल पटेल आणि इरफान शेख अशी आरोपींची नावे आहेत. राज्यात आता रेस्टॉरंट्स आणि बार जास्त वेळ सुरू राहणार, ग्राहकांना दिलासा! यांच्याकडून कांदिवली पोलिसांनी चार कॉम्पयुटर, एक लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बनावट कॉल सेंटरशी संबंधित अनेक उपकरणे जप्त केली आहेत. अमेरिकेतली शहरं, तिथल्या वेळा, लोकांच्या कामाची पद्धत, बँकांची माहिती अशा सगळ्या गोष्टींचा या युवकांनी अभ्यास केला होता. हे सगळे उच्चशिक्षित असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. MPSC परीक्षा घेतली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजेंचा थेट इशारा गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे ऑनलाईन व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ही फसवणूक जास्त प्रमाणात होत आहे. नागरिकांनी व्यवहार करतांना काळजी घ्यावी. भुलथापांना बळी पडू नये असं वारंवार सांगितलं गेलं. ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती करून घेतली पाहिजे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या