मुंबई, 24 जून: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एम्बरग्रीस (Ambergris) म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या उलटीची किंमत तब्बल 7.75 कोटी रुपये इतकी आहे. व्हेल माशाची उलटी इतकी महाग असल्याने त्याला समुद्रातील तरंगतं सोनं असंही म्हटलं जातं.
एम्बरग्रीस ही एक असा पदार्थ आहे जो स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. एम्बरग्रीस हे समुद्रात तरंगताना अनेकदा आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत एम्बरग्रीसची तस्करी करण्याचे अनेक प्रकार भारतात आढळून आले आहेत.
भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटीची खरेदी किंवा विक्री करणं बेकायदेशीर आहे. याच महिन्यात बंगळुरू पोलिसांनी 6.7 किलो एम्बरग्रीस जप्त केले होते. पोलिसांनी यावेळी चार आरोपींनाही अटक केली होती. यासोबतच गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये सुद्धा एम्बरग्रीस जप्त करण्यात आले होते.
Mumbai Police Crime Branch arrests two persons with Rs 7.75 crore worth whale ambergris pic.twitter.com/8dVl45MTkq
— ANI (@ANI) June 24, 2021
नागपूर हत्या-आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आलोक YouTube वर पहायचा 'ते' VIDEO
काय असतं एम्बरग्रीस?
एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलशील पदार्थ असतो. जो हलक्या ग्रे किंवा काळ्या रंगाचा असतो. एम्बरग्रीस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होते आणि व्हेल मासा ते तोंडाच्या माध्यमातून बाहेर फेकतो. याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आहे आणि त्यामुळे अनेकदा याची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे.
व्हेल माशाची उलटी इतकी महाग का?
एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटीची अनेक देशांत तस्करी केली जाते. बहुतेक देशांत याच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आहे. व्हेल माशाच्या उलटीची किंमत कोट्यावधी रुपयांत असते. ज्याचा उपयोग परफ्युम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे परफ्यूमचा वास बराच कााळ ठिकवून ठेवण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Mumbai police