मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /YouTube चॅनेलच्या संचालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 50 लाखांचा चरसही जप्त

YouTube चॅनेलच्या संचालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 50 लाखांचा चरसही जप्त

या संचालकाला (Director) अटक (Arrested) करुन पोलिसांनी त्याच्याकडून किलो चरस जप्त केला आहे.

मुंबई, 04 सप्टेंबर: शुक्रवारी मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) एक यूट्यूब चॅनेलच्या (YouTube channel)संचालकावर कारवाई केली आहे. या संचालकाला (Director) अटक (Arrested) करुन पोलिसांनी त्याच्याकडून किलो चरस जप्त केला आहे. बाजारात याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचं सांगितले जात आहे.

या कारवाई संदर्भात एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गौतम दत्ता (43) याला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं (ANC) अंधेरी (पश्चिम) येथून अटक केली.

तालिबानचा आनंद गगनात मावेना, हवेत केलेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू

अधिकाऱ्यानं सांगितलं की, दत्ता हा जुहू- वर्सोवा लिंक रोड भागात राहतो. दत्ता यूट्यूबवर एक चॅनेल चालवतो आणि त्या चॅनेलचा तो संचालक देखील आहे. अटक असलेला दत्ता बॉलिवूडशी चांगले संबंध असून तो कलाकारांना चरस पुरवतो असा संशय आहे.

या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Mumbai police, YouTube Channel