• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राज कुंद्रा अटकेप्रकरणी कार्यालयातल्या एकाला अटक, पोलिसांची कारवाई

राज कुंद्रा अटकेप्रकरणी कार्यालयातल्या एकाला अटक, पोलिसांची कारवाई

Shilpa Shetty husband Raj Kundra arrest: प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली.

  • Share this:
मुंबई, 20 जुलै: प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा यांना (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक केली. त्यानंतर आता राज कुंद्राच्या कार्यालयातील एकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. रायन थॉर्पयाला असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी रायन यांना राज कुंद्राचे व्हाटसपचॅट समोर आल्याने मोठा खुलासा झाला. त्यानंतर नवी मुंबईतून अटक केली आहे. (Shilpa Shetty's husband Raj Kundra) शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी( Mumbai police arrest) त्याला अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लिल चित्रफीत रेकॉर्ड करणे आणि प्रसिद्ध केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. मुंबईत ड्रग्जचा धंदा करणाऱ्या फरार दोन महिला आरोपींचा NCBकडून शोध  मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्या विरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोर्नग्राफ व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपासात राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वृत्तसंस्था ANI शी संवाद साधत मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, यामध्ये तो मुख्य सूत्रधार असल्याचं कळत आहे. याबाबतीत आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत.
Published by:Pooja Vichare
First published: