मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत NCBची कारवाई; 77 लाख रोख रक्कम जप्त, दोन फरार महिला आरोपींचा शोध सुरु

मुंबईत NCBची कारवाई; 77 लाख रोख रक्कम जप्त, दोन फरार महिला आरोपींचा शोध सुरु

NCB Raid:  गेले दोन दिवस मुंबईत कारवाईचा सपाटा लावला आहे. गेल्या दिवसात मध्य आणि पश्चिम मुंबईत (Mumbai) केलेल्या कारवाईत ड्रग्ज मोठा साठा एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 20 जुलै: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (The Narcotics Control Bureau) गेले दोन दिवस मुंबईत कारवाईचा सपाटा लावला आहे. गेल्या दिवसात मध्य आणि पश्चिम मुंबईत (Mumbai) केलेल्या कारवाईत ड्रग्ज मोठा साठा एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोन महिला हा ड्रग्जचा धंदा चालवत असल्याची माहिती मिळाली असून सध्या त्या फरार (2 women leaders absconding) आहे. एनसीबीकडून या फरार महिलांचा शोध सुरू आहे.

या फरार आरोपी महिला ड्रग्जचा धंदा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Zonal Director of NCB Mumbai Sameer Wankhede) यांच्या नेतृत्त्वात एनसीबीनं छापा टाकला.

आज संसदेत काय बोलणार पंतप्रधान? साऱ्यांचं लक्ष मोदींच्या भाषणाकडे

या छापेमारीदरम्यान एकूण 109.8 ग्रॅम मेफेड्रॉन (व्यावसायिक प्रमाणात) जप्त करण्यात आले. तसंच रोख रक्कम जप्त करण्यात आली असून सुमारे 77.92 लाख रुपये आणि 585.5 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास 24.4 लाख आहे.

रविवारी आणि सोमवारी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला भागात छापा टाकण्यात आला. या कारवाईत एनसीबीनं तीन ड्रग्ज पेडर्लसना अटक केली आहे.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, NCB, Raid, Woman