मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पोलिसांची श्रीनगरमध्ये मोठी कारवाई, ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या

मुंबई पोलिसांची श्रीनगरमध्ये मोठी कारवाई, ड्रग्ज तस्कराच्या आवळल्या मुसक्या

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबई पोलिसांच्या टीमने एका बड्या ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या टीमने जम्मू-काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईत चरस आणि इतर ड्रग्जचा सल्पाय करणाऱ्या बड्या तस्कराला (Drug supplier arrest) अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) टीमने काश्मीरमधील श्रीनगर (Srinagar) येथून ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 6 ने ही कारवाई केली आहे. श्रीनगर येथे करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान स्थानिक काश्मिरी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या टीमला मदत केली.

चरस सप्लायर गुल्जार अहमद खान (Charas Supplier Gulzar Maqbool Ahmed Khan) हा केवळ श्रीनगर पोलिसांच्या रडारवर नव्हता तर मुंबई पोलिसही त्याच्या मागावर होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दहिसर टोलनाक्यावर 24 किलो चरस घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली होती. त्या चौघांच्या चौकशीनंतर पोलीस गुल्जार अहमद खान याच्या मागावर होते.

वाचा : अनर्थ घडण्याआधीच घटनास्थळी पोहोचले पोलीस, सतर्कतेमुळे वाचला मायलेकीचा जीव

श्रीनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई

ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान हा श्रीनगर येथे असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाले. तेथे श्रीनगर पोलिसांच्या पथकासोबत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान याला बेड्या ठोकल्या. 8 जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे अडचणी

ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान याला श्रीनगर येथील मगरमल बाग परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधिकारी रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. काश्मीरमधील खराब हवामान आणि सातत्याने सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान याला मुंबईत आणण्यास पोलिसांना उशीर झाला. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं.

वाचा : मोठा अपघात टळला; रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब, राजधानी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट

सुरुवातीच्या तपासात क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनाअसे आढून आले की, गुल्जार अहमद खान हा एक डीलर होता आणि 25 टक्के नफ्यावर तो डीलर्सला पुरवठा करत होता. त्याला यापूर्वी 2010 मध्येही वरळीच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आता मुंबई पोलीस ड्रग्ज तस्कर गुल्जार अहमद खान याची कसून चौकशी करत असून त्याच्यासोबत आणखी कोण ड्रग्ज पेडलर सहभागी आहेत आणि ड्रग्ज कुठून आणत होता याचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Drug case, Jammu and kashmir, Mumbai police