जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मोबाईल पेट व्हॅन, पाहा कशी करते काम Video

Mumbai News : पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मोबाईल पेट व्हॅन, पाहा कशी करते काम Video

Mumbai News : पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मोबाईल पेट व्हॅन, पाहा कशी करते काम Video

मुंबईत पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोबाईल पेट व्हॅन सुरू करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : मुंबईत कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे असते. आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती. ती आता हॅप्पी बड्स संस्थेनं दूर केली असून बोरिवली परिसरात मोबाईल पेट व्हॅन सुरू केली आहे. ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक असून कुठेही घेऊन जाता येते. मुंबईत परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार केंद्र असून ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते. भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरिवली येथील कोरा केंद्र या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. मुंबईत कुत्रे आणि मांजरी यांची संख्या लाखांहून अधिक आहे. त्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्यदृष्ट्या योग्य असतीलच असे नाही. त्यामुळे कुत्रे वा मांजरांची संख्या लक्षात घेऊन हॅप्पी बड्स संस्थेचे सचिव अमरदिप मोटेराव आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याकडून ही व्हॅन तयार करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हॅन अनेक ठिकाणी सुरू करणार  हॅप्पी बड्स संस्थेचे सचिव अमरदिप मोटेराव सांगतात की, आमच्याकडे एक लॅब्रो डॉग होता मात्र कोरोनाच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी परळचे अंत्यसंस्कार केंद्र बंद असल्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे असा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. त्यामुळे आपल्यासारखेच अनेक जण मुंबईत राहत असून जागेच्या अडचणीमुळे किंवा अंत्यसंस्कार कुठे करावा याबद्दल माहीत नसल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि आपल्याला झालेली अडचणी इतरांना होऊ नये यासाठी मोबाईल पेट कॅरीमेशन व्हॅन या संकल्पनेवर काम करून ही व्हॅन तयार केली. येत्या काळात अशाच व्हॅन अनेक ठिकाणी सुरू करणार असल्याचे देखील ते सांगतात.

Dog Care : पावसाळ्यात कुत्र्याला गोचिड चिकटू नये म्हणून ‘ही’ सोपी ट्रिक्स करा फॉलो, Video

देशातील पहिली अशी व्हॅन  हॅप्पी बड्स फाउंडेशनच्या माध्यमातून प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणारी व्हॅन आम्ही तयार केली आहे. या गाडीच्या आतमध्ये आम्ही इलेक्ट्रिकल फर्नेस लावलेला आहे. आणि या गाडीमध्ये प्राण्यांचे आदरपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही देशातील पहिली अशी व्हॅन आहे ज्यामध्ये अंतिम संस्कार हे गाडीतच होणार आहेत. निसर्गाला पूरक अशी योजना आम्ही आणलेली आहे. रस्त्यावरील भटके कुत्री किंवा मांजरी यांच्यासाठी ही व्हॅन मोफत असणार आहे तर घरगुती पाळीव कुत्रे किंवा मांजरांसाठी तीन हजार रुपये फी आकारण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात