Home /News /mumbai /

मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

एनआयएने मुंबईत एक मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या दोघांना एनआयएने अटक केली आहे.

मुंबई, 13 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधीत छापेमारी दरम्यान एनआयए (NIA)ने आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने मुंबईतील दोन तरुणांना बेड्या ठोकल्या (NIA arrest two suspects from Mumbai) आहेत. छोटा शकील याच्यासोबत व्यवहार केल्याच्या प्रकरणात एनआयएने दोघांना अटक केली आहे. आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ ​​शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ ​​शब्बीर हे दोघेही मुंबईतील ओशिवरा परिसरात वास्तव्यास आहेत. दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि अटक करण्यात आलेल्या या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. त्याच प्रकरणात एनआयएने चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांनाही अटक केली आहे. वाचा : मुंबईत दाऊदचं साम्राज्य इक्बालच सांभाळायचा, मोठ्या नेत्याचं नाव समोर येण्याची शक्यता अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना एनआयएची टीम आज कोर्टात हजर करणार आहे. हे दोन्ही आरोपी दाऊद इब्राहिमच्या डी गँगसाठी टेर फंडींगसाठी मुंबईतून पैसे जमा करत असल्याचा आरोप आहे. या दोघांमध्ये आणि छोटा शकील याच्यात महिनाभरापूर्वी आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एनआयएच्या टीमने मुंबई आणि उपनगरात एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली होती. 9 मे रोजी करण्यात आलेल्या या छापेमारी दरम्यान 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. एनआयएचे पथक गेल्या ४ दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 13 जणांची चौकशी करत होते. त्यानंतर आता छोटा शकीलच्या दोन हस्तकांना बेड्या ठोकल्या आहेत. छोटा शकील विरोधात रेड कॉर्नर नोटीस त्याच दरम्यान इंटरपोलने छोटा शकील विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये छोटा शकीलचा सहभाग आहे. एनआयएने चोटा शकीलच्या दोन हस्तकांना अटक केल्यानंतर आता त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Dawood ibrahim, Mumbai, Nia

पुढील बातम्या