मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai News: हॉटेलात ताव मारून पोबारा; बनावट Paytm अ‍ॅपद्वारे गंडा घालणाऱ्या उच्चभ्रू जोडप्याला अटक

Mumbai News: हॉटेलात ताव मारून पोबारा; बनावट Paytm अ‍ॅपद्वारे गंडा घालणाऱ्या उच्चभ्रू जोडप्याला अटक

महागड्या हॉटेलात भरपेट ताव (Eat in expensive hotel) मारल्यानंतर बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे (Fake Paytm App) बिल भरल्याचं भासवून हॉटेलचालकांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चभ्रू जोडप्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Couple arrest) आहे.

  • Published by:  News18 Desk
वसई, 30 जून: महागड्या हॉटेलात भरपेट ताव (Eat in expensive hotel) मारल्यानंतर बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे (Fake Paytm App) बिल भरल्याचं भासवून हॉटेलचालकांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चभ्रू जोडप्याच्या वसई पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Couple arrest) आहे. संबंधित जोडप्यानं परिसरातील अनेक हॉटेलात भरपेट ताव मारून हॉटेलचालक, पेट्रोल पंप, पब चालकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी दाम्पत्याचा माग घेतं त्यांना गजाआड केलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. खरंतर इंटरनेटवर सध्या अनेक नामांकित कंपन्यांचे बनावट अ‍ॅप सहज उपलब्ध होतं आहे. अशाच बनावट अ‍ॅपचा वापर करत या जोडप्यानं अनेकांना फसवण्याचा धडाका लावला होता. वसईतील रहिवासी असणारं हे उच्चशिक्षित जोडपं महागड्या हॉटेलमध्ये जाऊन भरपेट जेवायचे, मद्यपान करायचे, यानंतर बनावट अ‍ॅपद्वारे बिल दिल्याचं भासवायचे. मागील काही दिवसांपासून जोडप्यानं अशाच प्रकारे असंख्य हॉटेल चालकांना गंडा घातला आहे. आदर्श राय (वय-21) आणि करिना सोलंकी (वय-21) असं अटक केलेल्या जोडप्याचं नाव आहे. 23 जून रोजी हे जोडपं वसईतील 'पोस्ट ऑफिस' नावाच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलं होतं. याठिकाणी त्यांनी नेहमीप्रमाणे भरपेट ताव मारला. त्याचं 6 हजार 400 रुपये जेवणाचं बिल झालं. आरोपी जोडप्यानं बनावट अ‍ॅपद्वारे बिल भरल्याचं भासवलं. हॉटेलमधील मॅनेजरला बिल भरल्याचा मेसेज दाखवून त्यांनी लगेच तेथून काढता पाय घेतला. हेही वाचा- चोरट्यांनी गोठ्यातून बकरी पळवली; बकरीचोरी सीसीटीव्हीत कैद, VIDEO VIRAL पण खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज न आल्यानं मॅनेजरचा संशय बळवला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मॅनेजरनं वसई पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपी जोडप्याचा शोधत घेत त्यांना अटक केली आहे. दोन्ही तरुण उच्चशिक्षित असून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतात. पण कोरोनाकाळात हाताला काम नसल्यानं दोघंही बेरोजगार झाले होते. परिणामी त्यांनी मौजमजा करण्यासाठी त्यांनी बनावट अ‍ॅपद्वारे हॉटेलचालकांना गंडा घालायला सुरुवात केली.
First published:

Tags: Application, Apps, Crime news, Financial fraud, Mumbai, Tech news, Technology

पुढील बातम्या