मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ड्रग्ज तस्कर मुंबईत SEX रॅकेट चालवतात; NCBचा मोठा खुलासा

ड्रग्ज तस्कर मुंबईत SEX रॅकेट चालवतात; NCBचा मोठा खुलासा

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून दररोज ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून दररोज ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून दररोज ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबई, 20 एप्रिल: ड्रग्ज प्रकरणात (Drug) तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. एनसीबीच्या तपासात ड्रग्ज तस्करांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीत असा खुलासा झाला आहे की मुंबईतील ड्रग्ज तस्कर लोकांना ड्रग्जचा पुरवठा करण्यासोबतच सेक्स रॅकेट (Sex Racket)ही चालवतात. हा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या डोंगरीतील लेडी डॉन अशी ओळख असलेली आणि ड्रग्ज तस्कर इकरा कुरेशीने केला आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इकरा कुरेशी महिलांची एक टोळी चालवते. तिने मुंबईतील डान्स बार आणि पबमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 महिलांची एक टोळी तयार केली आहे. या टोळीत सामील असलेल्या महिला लोकांना खूपच सहज ड्रग्जचा पुरवठा करत असत. इतकेच नाही तर ड्रग्ज विखत घेणारा ग्राहक त्यांच्याकडे सेक्सची मागणी करत असत. त्यानंतर या महिला ती मागणी सुद्धा पूर्ण करत असत. यासाठी त्या ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे सुद्धा घेत असत.

धक्कादायक! प्रियकराला मारहाण करुन तरुणीवर सामूहिक बलात्कार 

एनसीबीने इकरा कुरेशीच्या एका ठिकाणाची माहिती मिळाली आहे जेथे ड्रग्ज तस्करीसोबतच सेक्स रॅकेट चालवले जात होते. सूत्रांच्या मते, वांद्रे परिसरातील एक पबमध्ये इकरा कुरेशीच्या टोळीतील महिला हा सर्व धंदा करत असत. इकरा कुरेशी आणि तिची टोळी या गोरखधंद्यासाठी डान्स बार आणि पब यांची निवड करत असे. जेणेकरुन पोलिसांना किंवा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय येणार नाही. इकराच्या आणखी काही ठिकाणांबाबत एनसीबीला माहिती मिळाली असून त्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

इकरा कुरेशीला काही दिवसांपूर्वी एनसीबीने डोंगरी परिसरातून ड्रग्जसह अटक करण्यात आले होते. ती स्वत:ला डोंगरीची लेडी डॉन म्हणून घ्यायची. इकराचा प्रियकर छोटू हा एक मोठा ड्रग्ज तस्कर आहे. इकरा पूर्वी त्याच्यासोबतच ड्रग्जचा धंदा करत होती मात्र, नंतर दोघांत वाद निर्माण झाल्याने इकराने पोलिसांना टिप देऊन त्याला अटक केली. सध्या तो कारागृहात आहे.

21 वर्षीय इकरा यापूर्वी आपल्या पतीला मारहाण केल्याच्या प्रकरणात तुरुंगात जाऊन आली आहे. इकरा इतकी चलाख आहे की तिने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही पाळत ठेवली होती. तसेच त्यांच्यासंदर्भात माहितीही गोळा करत असे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, NCB, Sex racket