जमशेदपूर, 20 एप्रिल: झारखंड (Jharkhand)च्या जमशेदपूर (Jamshedpur) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच तरुणांनी मिळून एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangraped) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पटमदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत तलावाच्या शेजारी बसली होती त्यावेळी तेथे आलेल्या पाच जणांनी तिच्या प्रियकराला बेदम मारहाण (boyfriend beaten by accused) केली आणि तरुणावर सामूहिक बलात्कार केला.
सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी धनराज महतो, रंजीत महतो, कल्लू महतो, बुलेट महतो आणि हरी महतो हे पटमदा वस्तीत राहणारे आहेत. या सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पीडित तरुणीने सांगितले की, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ती आपल्या प्रियकरासोबत दुचाकीवरुन तलावाच्या जवळ गेली होती. तलााच्या जवळ दोघेही बसले होते त्यावेळी पाचही आरोपी घटनास्थळावर पोहोचले. यावेळी आरोपींनी प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्याची बाईक सुद्धा घेतली. यानंतर आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
वाचा: ती पळत होती आणि गुंड चाकूने सपासप वार करत होते, नागपूरमध्ये लेडी डॉनची भर रस्त्यावर हत्या
घटनास्थळी पोलीस दाखल होताच आरोपींनी तेथून पळ काढला. पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, पाचही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून प्रियकराची बाईकसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
पटमदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अशोक राम यांनी सांगितले की, पाच तरुणांनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत तलावाच्या शेजारी बसली होती त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपींनी प्रियकराला मारहाण केली आणि त्यानंतर पीडित मुलीसोबत गैरकृत्य केलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape, Jharkhand