• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • जगातील मोठ-मोठ्या मेट्रो मार्गालाही मागे टाकले 'मुंबई मेट्रो'; यंत्रणा पाहून थक्क व्हाल!

जगातील मोठ-मोठ्या मेट्रो मार्गालाही मागे टाकले 'मुंबई मेट्रो'; यंत्रणा पाहून थक्क व्हाल!

रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे पेट्रोल आणि वाया जाणारा वेळ असं दुहेरी नुकसान मुंबईकरांना सहन करावं लागतं.

  • Share this:
मुंबई, 21 जून : मुंबईतील वाहतूक कोंडी हा सर्वांसाठीच मनस्ताप राहिला आहे. पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतुक कोंडीमुळे तर अनेकांचे कामाचे तास वाया जातात. रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे पेट्रोल आणि वाया जाणारा वेळ असं दुहेरी नुकसान मुंबईकरांना सहन करावं लागतं. रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी तेव्हाच जरा कमी होईल जेव्हा मेट्रो धावेल. पण मग मेट्रोत गर्दी वाढली तर? लोकल ट्रेनच्या तुलनेने लहान असणारी मेट्रो गर्दीचा लोंढा सांभाळू शकेल? या प्रश्नाचं उत्तर हो असं मिळालं तर तुम्हाला नवल वाटेल ना. पण खरंच गर्दीचा लोंढा सांभाळण्यासाठी मेट्रोचा एक जबरदस्त प्लान तयार आहे. तो म्हणजे दर दीड मिनिटाला मेट्रो चालवण्याचा. आणि हे शक्य आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणानी दर दीड मिनिटाला मेट्रो धावु शकेल तिही ड्रायव्हरविना, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Mumbai Metro) सीबीटिसी या सिग्नल टेक्नॉलॉजिच्या माध्यमातुन मेट्रो सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासुन दर दीड मिनिटाला मेट्रो धावु शकते. सामान्य भाषेत म्हणायचं झालं तर दोन ट्रेनमध्ये याबाबत संवाद साधला जाईल. त्यानुसार पुढच्या ट्रेनची गती, अंतराचा अंदाज घेऊन मागून येणाऱ्या ट्रेनला आपली गती नियंत्रित करता येते. या दोन ट्रेन मधलं सुरुक्षित अंतर ज्याला हेडवे म्हटलं जातं ते राखण्यास मदत होते. नुसती ट्रेनची संख्याच वाढते असं नाही तर दोन्ही ट्रेनमध्ये टक्कर होणार नाही याची काळजी ट्रेन आणि सिग्नल यंत्रणाच घेते. त्यामुळे मुंबई मेट्रोचा नवा सुरु होणार असलेला मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अ हा जगातील पहिला कमी हेडवे असलेला मेट्रो मार्ग ठरु शकतो. हे ही वाचा-सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी बातमी मुंबई मेट्रोच्या या अंधेरी पुर्व ते दहिसर पुर्व आणि अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम या दोन्ही मार्गावर धावण्यासाठी मेट्रो ट्रेन अशा तयार करणात आल्या आहेत की त्यांना चालकाची गरज पडणार नाही. व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (व्हीव्हीव्हीएफ) या तंत्रज्ञानाच्या फायद्यामुळे ड्रायव्हरवर होणारा खर्चही शुन्य असल्यासारखाच आहे. सुरुवातीला भलेही ड्रायवर या मेट्रोत असले तरी काही कालावधीत मेट्रो चालकाविना धावु शकेल, अर्थात प्रवासी या संकल्पनेला किती पाठींबा देतात यावर अवलंबून आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई पनवेल या एमएमआरभागात जवळपास 300 किमीचं जाळ तयार होत आहे. पण मेट्रो चालवण्यासाठी तयार केलेल्या राज्यसरकारी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन म्हणजेच एमएमएमओसीएलने मनावर घेतलं आणि दर 90 सेकंदाला एक मेट्रो चालवली तर जगातल्या सगळ्या जुन्या मेट्रो म्हणजेच लंडनच्या द ट्युबलादेखील मुंबई मेट्रो मागे टाकेल.
Published by:Meenal Gangurde
First published: