मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

तीन वेळा इशारा देऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नव्हते, महापौर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

तीन वेळा इशारा देऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नव्हते, महापौर किशोरी पेडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

Kishori Pednekar reaction: मुंबईतील या घटनांमध्ये तब्बल 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  (Mayor) यांनी प्रतिक्रिया (Reaction)दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 18 जुलै: मध्यरात्री मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये (Chembur Wall Collapsed) भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. तर विक्रोळीमध्ये (Vikhroli House Collapsed) एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील या घटनांमध्ये तब्बल 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया (Reaction) दिली आहे.

घडलेल्या दोन्ही घटना दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नव्हते. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते, त्यावेळी त्याला विरोध केला जातो, असं त्या म्हणाल्यात.

चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. तेथील नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं होतं, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना-भाजप-एनसीपी एकत्र येण्याची चर्चा, त्यावर संजय राऊत म्हणतात...

पावसाच्या काळात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता तुम्ही पावसाच्या दिवसात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. दरवर्षी इतर ठिकाणीही लोकांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात येतं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे, असं महापौर म्हणाल्यात.

घडलेली घटना क्लेशदायक असून नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे, असं आवाहन महापौरांनी यांनी मुंबईकरांना केलं आहे.

First published:

Tags: Kishori pedanekar, Mumbai, Mumbai rain, Vikhroli- Ghatkoper