विजय वंजारा, मुंबई, 17 जुलै : वांद्रे बँड स्टँड येथे एक तरुणी समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी पाच अल्पवयीन मुले मालाड पश्चिमेकडील मार्वे समुद्रात बुडाली. ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. यापैकी दोन मुलांना समुद्र किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांनी वाचवले. तर तिघांचे मृतदेह सापडले आहेत. कालपासून नौदल, तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मृतदेह सापडल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई शहर व उपनगरात रविवार सकाळपासूनच पावसाची उघडीप सुरू आहे. सकाळच्या वेळी समुद्राला भरतीही होत त्यातच मालाड मार्वे परिसरातील १२ ते १६ वयोगटातील पाच अल्पवयीन मुले मार्वे समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळत होती. फूटबॉल खेळत असताना, त्यांचा बॉल पाण्यात गेला. तो आणण्यासाठी एक मुलगा समुद्रात गेला. मात्र, फूटबॉल तरंगत आत जात असल्याने या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. हे पाहताच उर्वरित चार जणांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. SDM Jyoti Maurya : निलंबन झालं तरी सरकारी गाडीतूनच फिरणार मनीष दुबे; ‘या’ सुविधा राहणार कायम साधारण अर्धा किलोमीटरवर ही पाचही मुले बुडत असल्याचे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांना दिसले. त्यानंतर स्थानिकांनी पाचही मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यापैका कृष्णा हरीजन (वय १६) आणि अंकुश शिवरे (१३) या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, आज सकाळी निखिल कायामकुर (१३) याच्यासह तिघांचे मृतदेह नौदलाच्या पथकाला सापडले आणि मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवून दिल आहे. इतर दोघांची नावे शुभम जैस्वाल (१२), आणि अजय हरीजन (१२) अशी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







