मुंबई, 26 मे : मंत्रिडळाची बैठक (State Cabinet Meeting) सुरू होण्यापूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित (power outage in Mantralaya) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारे मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी वीज पुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
मंत्रालयातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा संपर्क तुटला होता. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
17 मे रोजी अचानक वीज पुरवठा खंडीत
राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला लोडशेडिंगचा फटका बसला होता. एवढंच नाहीतर अनेक मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गूल झाली होती. एक तास वीज खंडीत झाला होता.
मुंबईत मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात 17 मे रोजी संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. तब्बल 1 तास वीज पुरवठा बंद होता. त्याच दिवशी सकाळी सुद्धा वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा मंत्र्यांच्या बंगल्यातील लाईट केली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात वीज गेली होती.
मंत्र्यांच्या बंगल्यातील व्यवस्थापकांना विचारले असता, सकाळी वीज पुरवठा खंडीत झाला होता. नेमकं वीज पुरवठा का ठप्प झाला याचे कारण अजून कळू शकले नाही, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती दिली होती.
नेमकं काय झालं होतं?
17 मे रोजी अचानक मुंबईत काही मंत्र्यांना अघोषित लोडशेडिंगचा फटका बसला. मंत्रालयासमोरील काही मंत्र्यांच्या बंगल्याची चक्क बत्ती गुल झाली होती. विशेष म्हणजे, नेमकं काय झालंय ? हे जाणून घेण्यासाठी ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांच्या बंगल्यावरून सातत्यानं संपर्क केला जात होता. मात्र अत्यंत टाळाटाळ करणारी उत्तरं मिळत असल्याचं व्यथित उत्तर चक्क मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. दोषींची चौकशी करून कारवाई करणार असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.