मुंबई, 1 सप्टेंबर : मुंबईतील पश्चिम उपनगरात (Mumbai) असलेल्या गोरेगाव (Goregaon) परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर (Leopard in Society) आढळून आला आहे. गोरेगाव परिसरात असलेल्या बिंबीसार नगर येथील एका रहिवासी सोसायटीत बिबट्या दिसून आला. सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. (CCTV caught leopard)
सोसायटीत बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या सोसायटीत बिबट्या आढळून आला ती सोसायटी आरेच्या जंगलाला लागूनच आहे आणि त्यामुळेच या सोसायटीत बिबट्या अगदी सहजरित्या शिरला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील रहिवासी सोसायट्यांमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे बिबट्याचा वावर पहायला मिळाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या परिसरात बिबट्या वारंवार येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, सोसायटीत बिबट्या शिरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा सोसायटीत वावर असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
कर्नाटकातील सोसायटीतही बिबट्या
सोशल मीडियात आणखी एका बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील बांदीपूर येथील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, एका घराचा दरवाजा उघडा आहे आणि तेथून बिबट्या अतिशय सावधगिरीने घरात प्रवेश करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.