मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, कोणतीही परिस्थिती हाताळण्यास तयार'

'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, कोणतीही परिस्थिती हाताळण्यास तयार'

तिसऱ्या लाटेचा (3rd Wave of Coronavirus) धोका लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात येत असून, नवीन नियम लागू करण्याबाबत शासन बृहन्मुंबई महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

तिसऱ्या लाटेचा (3rd Wave of Coronavirus) धोका लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात येत असून, नवीन नियम लागू करण्याबाबत शासन बृहन्मुंबई महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

तिसऱ्या लाटेचा (3rd Wave of Coronavirus) धोका लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात येत असून, नवीन नियम लागू करण्याबाबत शासन बृहन्मुंबई महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 08 जून : देशात हाहाकार माजवणारी कोविड-19ची दुसरी लाट (Covid-19 Second Wave) आता ओसरत असल्यानं अनेक राज्यांमधील लॉकडाउन (Lockdown) किंवा कडक निर्बंध हटवण्यात येत आहेत. या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातही हळूहळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारनं 5 स्तराची अनलॉक योजना (Unlock Plan) तयार केली असून, शहरातील, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि इतर व्यवस्था याचा आढावा घेऊन त्यानुसार तिथं अनलॉकची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई या शहरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळं इथं अत्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. ते आता हटवण्यात येत असून, मुंबई तिसऱ्या स्तरावर असल्यानं तिथं सर्व निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात येत असून, नवीन नियम लागू करण्याबाबत शासन बृहन्मुंबई महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याची ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुसऱ्या लाटेचा कहर आपण अनुभवलाच. आता तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला असून त्यात सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आधीच सज्ज झालं असून त्यादृष्टीनं नियोजन करत आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेऊन लोकांनी सुरक्षा नियमांचे पालन करणं आवश्यक आहे, अशी सूचना काकाणी यांनी केली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक असल्यानं सरकार लसीकरणाला (Vaccination) वेग देत आहे. मुंबईतही लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असून, 90 लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 31लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 8 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. सध्या दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण होते, त्यानुसार साठ दिवसात 60 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिवसाला दीड ते दोन लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लसीचा पुरवठा व्यवस्थित झाल्यास नियोजित वेळेत हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असं काकाणी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मुंबईत सर्वांना लोकल प्रवासाची (Local Railway) अद्याप परवानगी नाही, ती देण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत काकानी म्हणाले की, उपनगरीय लोकल सेवा आणि मेट्रो सर्वासाठी सुरू करण्यापूर्वी संपूर्ण परिसराचा आढावा घेणं आवश्यक आहे. दर 15 दिवसांनी आम्ही जिल्हावार आढावा घेऊन निर्णय घेतो, तसंच आढावा घेतल्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल. 15 जूननंतर याबाबत काही सवलती आणि ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली तर घरी न बसता ताबडतोब डॉक्टरकडे जावं. वेळेत निदान आणि उपचार रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. लसीकरण झाल्यानंतरही नियमित मास्क (Mask) वापरणे आणि सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर करणे या दोन गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर आपण तिसऱ्या लाटेलाच नव्हे तर भविष्यात येणाऱ्या अशा कोणत्याही साथीला यशस्वीपणे तोंड देऊ शकू असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus