Home /News /mumbai /

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; CID कडून चौकशी सुरू

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; CID कडून चौकशी सुरू

Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या विरोधात बी आर घाडगे यांनी तक्रार केली होती.

मुंबई, 17 मे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे (B. R. Ghadge) यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाने (CID inquiry) सुरू केली आहे. या प्रकरणात सीआयडीच्या टीमने तक्रारदार असलेले पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या तक्रारीत भिमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यासोबतच 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाचा: परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; सोनू जालान प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग, सूत्रांची माहिती परमबीर सिंग यांच्यासह इतर 27 पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सीआयडी टीम करत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या असून परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mumbai, Paramvir sing

पुढील बातम्या