मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /परमबीर सिंग यांना पुन्हा दिलासा; 15 जूनपर्यंत अटक नाही

परमबीर सिंग यांना पुन्हा दिलासा; 15 जूनपर्यंत अटक नाही

Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई, 10 जून : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Mumbai Ex CP Param Bir Singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता 9 जूनपर्यंत अटक होणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयात (High Court) दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे.

अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

BMC कुंभकर्णाच्या झोपेतून कधी जागी होणार? भाजपचा सवाल

परमबीर सिंग यांच्यासह इतर 27 पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचाही आरोप करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणावरून परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Mumbai, Paramvir sing