त्र्यंबकेश्वर, 06 जुलै: शाळा (School) हे विद्येचं केंद्र असतं, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला येथूनच कलाटणी मिळत असते. शालेय वयात शिक्षकांनी (Teacher) केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडत असतात, अशा या पवित्र स्थळाला एका शिक्षकानं कलंक फासला आहे. शिक्षकानं शाळेत बसूनच मद्यपान (Drink Alcohol) केल्याची घटना समोर आली आहे. दारु पिल्यामुळे संबंधित शिक्षकाला नीट बसताही येत नाही. त्यामुळे तो अर्धवट टेबलाखाली पडून बडबडताना दिसत आहे. गावातील काही तरुणांनी त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. संबंधित घटना ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरनजीक असणाऱ्या दापूरे गावातील आहे. तर संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवण्याचं काम करतो. सध्या लॉकडाऊन असल्यानं शाळा बंद आहे, अशात या शिक्षकानं शाळेलाच आपले दारुचा अड्डा बनवला आहे.
#Nashik
— The मराठी Medium (@MarathiMedium) July 6, 2021
गुरुजी वर्गातच दारू पिऊन झाले तर्राट, चक्क टेबलाखालीच झोपले.... pic.twitter.com/tD99Z0iyTF
हेही वाचा- पिंपरीत तरुणांची नागरिकांना कोयत्यानं मारहाण; पोलिसांनी काढली गावगुंडाची धिंड संबंधित मद्यधुंद शिक्षकाला आपण कुठे आहोत? आणि काय करत आहोत याचं देखील भान उरलं नाही. गावातील काही नागरिकांनी संबंधित मद्यधुंद शिक्षकाची कानउघडणी केली आहे. पण त्याची नशा उतरेपर्यंत शिक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाला आहे.