मुंबई, 7 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise Drug Party case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे (Vijay Pagare) याने यांनी मुंबई पोलिसांच्या एसआयटी समोर आपला जबाब 4 नोव्हेंबर रोजी नोंदवला आहे. त्यानंतर आता विजय पगारे यांनी माध्यमांसमोर येत खळबळजनक खुलासा केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला अडकवण्यात आल्याचा दावाही विजय पगारे यांनी केला आहे.
आर्यन खानला अडकवण्यात आले
विजय पगारे यांनी दावा केला आहेकी, 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत क्रूझवरील छापेमारी ही पूर्वनियोजित होती आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काहींनी पैसे कमावण्यासाठी अडकवले आहे.
विजय पगारे यांनी दावा केलाय की गेल्या काही महिन्यांपासून ते सुनील पाटील याच्यासोबत आहेत. माझे काही पैसे सुनील पाटील याच्याकडे आहेत. मी 2018 साली एका कामासाठी सुनील पाटीलला पैसे दिले होते. माझे काम झाले नाही आणि तो पैसेही परत देत नव्हता. ते पैसे मिळवण्यासाठी मी त्यांच्या संपर्कात होतो. मी त्यांच्यासोबत अहमदाबाद, सूरत आणि मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलो होतो. 27 सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. त्यावेळी किरण गोसावी, मनीष भानुशाली सुद्धा तेथे उपस्थित होते.
On Oct 3, Bhanushali met me & asked me to go with him to get money. While I was with him in the car, I heard them saying that a deal of Rs 25 crores was scheduled but settled on Rs 18 crores and Rs 50 lakhs taken: Vijay Pagare, a witness in drugs-on cruise-case
— ANI (@ANI) November 7, 2021
सेल्फीमुळे फसली डील
आर्यन खान प्रकरणात पूजा ददलानी, के पी गोसावी, मनिष भानुशाली आणि सुनील पाटील यांचयात डिल झाली होती. के पी गोसावीला 50 लाख रुपये मिळाले होते. उर्वरित 17 कोटी 50 लाख रुपये हे मिळणार होते मात्र, ते ते पोहोचले नाहीत. त्याचं कारण म्हणजे किरण गोसावी याने आर्यन खानसोबत काढलेली सेल्फी ठरली असंही विजय पगारे यांनी सांगितलं.
याच सेल्फीमुळे डिलचा मास्टरमाईंड असलेला सुनील पाटील हा किरण गोसावीवर प्रचंड संतापला. तुझ्या सेल्फीमुळे सर्व डील फसली. सेल्फीमुळे आपली 18 कोटींची डील गेली असं सुनील पाटील किरण गोसावीला बोलत होता असा दावाही विजय पगारे यांनी केला आहे.
सुनील पाटील नाव कसे आले समोर?
भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत सुनील पाटील या नावाचा उल्लेख केला. सुनील पाटील हा या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाईंड असून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे असा दावाही यावेळी मोहित भारतीय यांनी केला होता. मोहित भारतीय म्हणाले, गेल्या महिन्यापासून एक प्रकरण गाजत आहे. ते म्हणजे आर्यन खान प्रकरण… दोन तारखेला अटक झाली आणि 3 तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर 6 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनिल पाटील आहे. हा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे असा दावाही मोहित भारतीय यांनी केला आहे.
20 वर्षांपासून सुनील पाटील एनसीपीच्या संपर्कात
सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे आणि तो गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. सुनील पाटील हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याचा जिगरी मित्र आहे. सुनील पाटील हा बदल्यांचं रॅकेट चालवत होता. सुनील पाटील याचे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्याचाही गंभीर आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे.
किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस
मोहित भारतीय यांनी पुढे म्हटलं, किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस आहे. सुनील पाटील यांनी किरण गोसावींचा नंबर सॅम डिसूझाला दिला होता. इथे हा प्रश्न निर्माण होत आहे की एनसीपीने सुनील पाटीलला पुढे करत हे का केले, कोण मंत्री आहे जे हे सगळे करत आहेत. खूप सिनियर लिडर आहे, मी त्यांच्यावर आरोप लावत नाही पण त्यांना हे सांगावे लागले की, त्यांच्या लोकांचे, मंत्र्यांचे पक्षाचे या व्यक्तींशी काय संबंध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drug case