मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 RCB vs DC: फिंचला मैदानातच धमकी देऊन थांबला अश्विन, 'या' कारणामुळे केलं नाही आऊट! पाहा VIDEO

IPL 2020 RCB vs DC: फिंचला मैदानातच धमकी देऊन थांबला अश्विन, 'या' कारणामुळे केलं नाही आऊट! पाहा VIDEO

अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही.

अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही.

अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही.

दुबई, 06 ऑक्टोबर : आयपीएल 2020 च्या (IPL 2020) या तेराव्या हंगामात काही बदल झाले आहे. जागेपासून संघांपर्यंत सर्व काही बदलले आहे. काही खेळाडू आपले संघ सोडून इतर संघांकडून खेळत आहे, त्यामुळे खेळाडूंच्या खेळण्याची पद्धतही बदलली आहे. याचा प्रत्यय बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात झाला. दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला (Ravichandran Ashwin) या सामन्यात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फलंदाजाला ताकिद दिली. असे सांगितले जात आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केले होते.

बंगळुरू विरुद्ध दिल्ली (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) यांच्यात झालेला सामना दिल्लीनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर जिंकला. या सामन्यात दिल्ली संघानं प्रथम फलंदाजी करत 196 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूकडून मैदानावर फिंच आणि पडक्कील सलामीला उतरले होते. त्यांनी 2.3 ओव्हरमध्ये 18 धावा केल्या, तेव्हा अश्विन गोलंदाजी करत होता. फिंच क्रिझ पुढे आल्याचे अश्विनने पाहिले आणइ तो थांबला मात्र त्याने फिंचला बाद केले नाही.

वाचा-IPL 2020 : दिल्लीला मोठा फटका! महत्त्वाचा स्पिनर अमित मिश्रा स्पर्धेबाहेर

अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही. उलट अश्विन स्टम्पजवळ उभा राहून हसू लागला. त्यानंतर फिंचला बाद न करता अश्विन पुन्हा गोलंदाजी करायला गेला.

वाचा-चेन्नई विरुद्ध पंजाब सामना होता फिक्स? शेन वॉट्सनच्या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात

अश्विनवर पॉटिंगचा दबाव

आयपीएल सुरू होण्याआधी अशी चर्चा होती की पॉटिंग आणि अश्विन यांच्यात मांकडिंगवरून वाद झाला होता. पॉंटिंगचे म्हणणे होते ती, फलंदाजाला ताकिद दिली पाहिजे, मात्र त्याला मांकडिंग करू नये. त्यामुळे पॉटिंगने अश्विनला असे न करण्यास सांगितले होते. त्यामुळे या सामन्यात अश्विननं कोचचे ऐकत फिंचला ताकिद दिली. गेल्या हंगामात पंजाबकडून खेळताना अश्विनने बेन स्टोक्सला मांकडिंग बाद केले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता.

First published:

Tags: R ashwin