जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Dawood Ibrahim गँगकडून मुंबईतील महिलेला धमकी, 75 वर्षीय व्यावसायिकाविरोधात बलात्काराच्या आरोपानंतर मोठा खुलासा

Dawood Ibrahim गँगकडून मुंबईतील महिलेला धमकी, 75 वर्षीय व्यावसायिकाविरोधात बलात्काराच्या आरोपानंतर मोठा खुलासा

Dawood Ibrahim गँगकडून मुंबईतील महिलेला धमकी, 75 वर्षीय व्यावसायिकाविरोधात बलात्काराच्या आरोपानंतर मोठा खुलासा

मुंबईतील 75 वर्षीय व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : Rape Case filed against businessman: मुंबईच्या (Mumbai) जुहू (Juhu) भागात 35 वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणात 75 वर्षीय व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल (Filing a crime against a professional) करण्यात आला आहे. महिलेने आपल्या तक्रारीत दिल्यानुसार, आरोपी व्यावसायिकाने तिला धमकीही दिली आहे. दाऊद इब्राहिमचं (Dawood Ibrahim) नाव घेत तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर डी गँगने दिली धमकी… या प्रकरणात तक्रारदार महिलेने सांगितलं की, आरोपी व्यावसायिकाचं ऐकलं नाही तर तिला डी गँगचा फोन आला होता. ज्यात तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर ती MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली होती. दोन कोटींचा अँगला काय आहे?  महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, आरोपी व्यावसायिकाने माझ्याकडून 2 कोटी रुपये घेतले होते. जे अनेकदा मागितल्यानंतरही त्याने दिले नाही. मी जेव्हा आपल्यावर होणारा अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उचलला, तर मला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस म्हणाले… या प्रकरणात स्थानिक पोलीस तपास करीत आहे. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिलेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात विविध पैलू लक्षात घेत तपास सुरू करण्यात आला आहे. यानंतरच या प्रकरणाबद्दल काही खुलासा केला  जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात