मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai : 19 वर्षीय महिलेवर तीन महिन्यांपासून सामूहिक बलात्कार; घटनेने मुंबई हादरली

Mumbai : 19 वर्षीय महिलेवर तीन महिन्यांपासून सामूहिक बलात्कार; घटनेने मुंबई हादरली

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत एका 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 15 जून : मुंबईतील कुर्ला परिसरात (Kurla Mumbai) 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (19 year old woman gang raped in Mumbai) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक (Neharu Nagar Police arrest 4 accused) केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या भावोजींचाही आरोपांमध्ये समावेश आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले जणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला ही कोलकाता येथील निवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली. त्यावेळी तिच्या भावोजींनी तिला कुर्ल्यातील एका खोली मालकाकडे तिला नेलं. त्या ठिकाणी काही भिकारी भाड्याने घर घेऊन राहत होते. वाचा : अहमदनगर हायवेवर सापडला मंचक पवारांचा मृतदेह;1 कोटींच्या विम्यासाठी पत्नीचा प्लान मिळालेल्या माहितीनुसार, याच घरातील भिकाऱ्यांकडून पैसे घेत पीडितेच्या भावोजींनी त्यांच्या हवाले मेहुणीला केलं. इतकंच नाही तर भावोजीनेही तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला शहरात नवीन असल्याने ती प्रचंड घाबरली आणि या बाबत तिने कुणालाही सांगितलं नाही. वाचा : 3 लाखाची दारूची बाटली चोरायला गेलेल्या चोरांचीच झाली फजिती; CCTV मध्ये कैद झाली घटना काही दिवसांनी पीडित महिला गरोदर झाल्याचं लक्षात येताच हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित महिलने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीडित महिलेचा भावोजी याच्यासह एकूण चौघांना अटक केली आहे. तर पाचवा आरोपी पश्चिम बंगालला फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आरोपींच्या विरोधात Prevention of Immoral Trafficking Act (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुण्यात महिलेवर बसमध्ये बलात्कार पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात महिलेचं अपहरण केलं आहे. एवढंच नाही तर अपहरण करून आरोपीनं महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. खोलीच्या शोधात असताना ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स सुरू करून कात्रज परिसरात नेली आणि तेथे बलात्कार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बस चालक नवनाथ शिवाजी भोग (वय 38) आरोपीला अटक करण्यात आली आहे.
First published:

Tags: Crime, Gang Rape, Mumbai

पुढील बातम्या