Home /News /mumbai /

देशातल्या सर्वांत मोठ्या कार कंपनीला धक्का, उत्पादन थेट 40 टक्क्यांनी होणार कमी!

देशातल्या सर्वांत मोठ्या कार कंपनीला धक्का, उत्पादन थेट 40 टक्क्यांनी होणार कमी!

की इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्सच्या पुरवठ्यावर होत असणाऱ्या परिणामामुळे सेमीकंडक्टर्सची टंचाई (Semiconductors scarcity) जाणवत आहे.

की इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्सच्या पुरवठ्यावर होत असणाऱ्या परिणामामुळे सेमीकंडक्टर्सची टंचाई (Semiconductors scarcity) जाणवत आहे.

की इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्सच्या पुरवठ्यावर होत असणाऱ्या परिणामामुळे सेमीकंडक्टर्सची टंचाई (Semiconductors scarcity) जाणवत आहे.

    कोरोना महामारीमुळे जगभरातल्या कित्येक मोठमोठ्या कंपन्यांना (Lockdown effect on car production) फटका बसला आहे. कित्येक कंपन्यांना आपलं शटर डाउन करावं लागलं, तर कच्चा माल पुरवणाऱ्या कंपन्या बंद असल्यामुळे मोठ्या कंपन्यांनाही आपलं उत्पादन कमी करावं लागलं आहे. यातच भारतातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीचाही (Maruti Suzuki production cut) समावेश आहे. बाजारात पुरेसे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट (Electrical component) आणि सेमीकंडक्टर्स (Semiconductors) उपलब्ध नसल्यामुळे कंपनीने आपलं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या माहितीपत्रकात म्हटलं आहे, की इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्सच्या पुरवठ्यावर होत असणाऱ्या परिणामामुळे सेमीकंडक्टर्सची टंचाई (Semiconductors scarcity) जाणवत आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे मारुती सुझुकी हरियाणा आणि गुजरातमध्ये असलेल्या आपल्या (Maruti Suzuki production cut by 40%) कारखान्यांमधलं उत्पादन 40 टक्क्यांनी कमी करणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या बॅचमध्ये ही कपात करण्यात येणार आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हरियाणामधल्या गुरुग्राम आणि मानेसर येथे कंपनीचे दोन प्लांट्स आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून एका वर्षात 15 लाख 80 हजार कार्स उत्पादित केल्या जातात. गुजरातमधल्या प्लांटमध्ये 5 लाख कार्सचं उत्पादन (Maruti Suzuki yearly production) केलं जातं. म्हणजेच, या दोन राज्यांमध्ये मिळून कंपनी एका वर्षात सुमारे 20 लाख कार्सचं उत्पादन करते. एरव्ही एका महिन्यात या तीन प्लांट्समध्ये एकूण 1 लाख 73 हजार कार्सची निर्मिती केली जाते; मात्र आता कपात करण्याच्या निर्णयानंतर 1 लाख 3 हजार 800 कार्सच (Maruti Suzuki September production) उत्पादित केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी सेलेरियो हॅचबॅक ही आपली नवी कार बाजारात आणत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सेलेरियोचे (Maruti Suzuki upcoming cars) हे मॉडेल लाँच केलं जाईल. काही दिवसांपूर्वीच या गाडीची काही फीचर्स लीक झाली होती. यासोबतच मारुती सुझुकी बॅलेनो कारचं पुढचं मॉडेल, फेसलिफ्टही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अर्टिगा, XL6 आणि विटारा ब्रिझाचाही समावेश आहे. FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी गेल्या आठवड्यातच सेमीकंडक्टर्सच्या टंचाईबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर 30 ऑगस्टला मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांची किंमत वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. सेमीकंडक्टर्सच्या टंचाईचा फटका केवळ मारुतीलाच नाही, तर इतरही बऱ्याच कंपन्यांना (Cars production) बसतो आहे. त्यामुळे हळूहळू त्यादेखील अशाच प्रकारचे निर्णय घेत आहेत. एकूणच कमी उत्पादन आणि वाढलेली किंमत यामुळे सणासुदीच्या काळातही गाड्यांचा खप कमी होणार असल्याचं दिसत आहे.
    First published:

    पुढील बातम्या